‘उद्धव ठाकरेंची होणार चौकशी’; उमेश कोल्हे प्रकरण, राणांचा स्फोटक आरोप

मुंबई तक

23 Dec 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:23 AM)

रवीदिशा सालियन प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा करण्यात आल्यानं आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यात आल्याचं बोललं जात असतानाच आता उद्धव ठाकरेंचीही एसआयटी मार्फत चौकशी होण्याची शक्यता निर्माण झालीये. अमरावतीतील उमेश कोल्हे प्रकरणात आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत त्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केलीये. त्याला सरकारकडून सकारात्मक उत्तर देण्यात आलंय. (Ravi rana […]

Mumbaitak
follow google news

रवीदिशा सालियन प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा करण्यात आल्यानं आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यात आल्याचं बोललं जात असतानाच आता उद्धव ठाकरेंचीही एसआयटी मार्फत चौकशी होण्याची शक्यता निर्माण झालीये. अमरावतीतील उमेश कोल्हे प्रकरणात आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप करत त्यांची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केलीये. त्याला सरकारकडून सकारात्मक उत्तर देण्यात आलंय. (Ravi rana demand SIT probe of uddhav thackeray in umesh kolhe murder case)

हे वाचलं का?

विधानसभेत लक्षवेधीवर चर्चा सुरू असताना बडनेराचे आमदार रवी राणा यांनी उमेश कोल्हे हत्या प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. रवी राणांनी या प्रकरणाचा तपास फिरवण्यासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस मंत्र्याच्या सांगण्यावरून उद्धव ठाकरेंनी हे केल्याचा दावा राणांनी केलाय.

रवी राणा यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप आणि एसआयटी चौकशीची मागणी

रवी राणा म्हणाले, ‘उमेश कोल्हे हत्याकांड 33 महिन्यांच्या सरकारच्या काळात झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे होते. उमेश कोल्हे हिंदू विचाराचे होते. हिंदू विचारांचा प्रचार-प्रसार करत होते. जेव्हा नुपूर शर्माची हत्या झाली, त्यावेळी त्यांच्या समर्थनार्थ उमेश कोल्हेंनी पोस्ट व्हायरल केली. त्यावेळी त्यांना धमक्या आल्या. धमक्या आल्यानंतरही अमरावतीच्या पोलीस अधीक्षक आरती सिंह यांनी हे गांभीर्यानं घेतलं नाही.’

Amravati Case: नुपूर शर्माचं समर्थन केल्यानेच उमेश कोल्हेची हत्या: NIA

‘जेव्हा उमेश कोल्हेंची चौकात हत्या करण्यात आली. त्यावेळी महाराष्ट्राचे तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तो तपास एका काँग्रेसच्या मंत्र्याच्या सांगण्यावरून चोरीच्या प्रकरणात बदलण्याचं सांगितलं,’ असा आरोप रवी राणांनी केलाय.

‘उमेश कोल्हेंना धमक्या येत असतानाही एक महिना अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांनी लक्ष दिलं नाही. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोन आला. हा संपूर्ण तपास चोरी झाल्याच्या दिशेनं करा आणि ही केस दाबा, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. या तपासाची दिशा बदलली,’ असं राणांनी सभागृहात म्हटलंय.

‘अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केस दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांना सांगितलं. त्यांनी एनआयएची चौकशी लावली. ती टीम आली. तेव्हा लक्षात आलं की, नुपूर शर्माच्या पोस्टचं उमेश कोल्हेंनी समर्थन केलं म्हणून हत्या करण्यात आली. या हत्येला दाबण्याचं काम उद्धव ठाकरेंनी केलं.’

ठाकरेंशी पंगा घेणारे रवी राणा कोण?

‘उद्धव ठाकरेंची एसआयटी चौकशी करा’ -रवी राणा

‘मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी करतो की, एसआयटीच्या माध्यमातून याची चौकशी झाली पाहिजे. पोलीस अधीक्षकांचीही चौकशी झाली पाहिजे. आदित्य ठाकरे सभागृहात नाहीत, पण त्यांना माझं सांगणं आहे की, काँग्रेसच्या सांगण्यावरून तुम्ही हिंदू विचारांच्या लोकांना दाबत असाल, तर हे सरकार हिंदू विचाराचं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याचा तपास करतील. उद्धव ठाकरेंनी केलेल्या फोनची चौकशी झाली पाहिजे,’ अशी मागणी रवी राणांनी विधानसभेत केली.

शंभूराजे देसाई म्हणाले, ‘लक्षवेधी बाहेरचा हा प्रश्न आहे. मी लक्षवेधी पुरती माहिती घेतलेली आहे. तरीसुद्धा सभागृहात जे सदस्य बोलतात, ते सत्य मानून त्यावर कार्यवाही करायची असते. ज्या गोष्टीचा उल्लेख राणा यांनी केला, त्या अमरावतीतल्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सविस्तर माहिती त्यांच्याकडून घेतली जाईल. त्यांचा आक्षेप तिथल्या पोलीस आयुक्तांवरती, त्यांच्या कार्यपद्धतीवर आहे. या संपूर्ण प्रकरणाचा राज्य गुप्तचर आयुक्तांकडून सविस्तर अहवाल 15 दिवसांत मागवला जाईल. गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे तो सादर केला जाईल. अहवाल आल्यानंतर यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल.’

रामदेव बाबाच्या शिबिरात भेट अन्…; नवनीत राणा आणि रवी राणांच्या लव्हस्टोरीचा किस्सा

त्यानंतर राणांनी पुन्हा मुद्दा उपस्थित केला. उमेश कोल्हे प्रकरणात जे आरोपपत्र दाखल झालं आहे. त्यासंदर्भाने उद्धव ठाकरेंची एसआयटी मार्फत चौकशी करावी, अशी माझी मागणी आहे,’ असं ते म्हणाले. देसाई म्हणाले, ‘त्यांनी एनआयएकडे तक्रार केली. एनआयएने आरोपपत्र दाखल केलंय. मग आपले पोलीस करत होते. हा तपास ज्या दिशेनं व्हायला पाहिजे होता, त्या दिशेनं झाला नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणून मी म्हणालो की, 15 दिवसांत अहवाल मागवला जाईल. सर्व नोंदी तपासल्या जातील. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिला जाईल.’

    follow whatsapp