‘आदित्य ठाकरेंच्या सभेला गर्दी पाहिली का?’ म्हणताच बंडखोर आमदार भूमरे शिवसैनिकांवर चिडले, म्हणाले…

मुंबई तक

24 Jul 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:54 AM)

औरंगाबाद: शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सध्या शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यातील जवळपास सर्वच आमदारांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) आपला नेता मानले आहे. आदित्य ठाकरेंच्या या शिव संवाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. याचा प्रत्यय सध्या व्हायरल होत असलेल्या एका कॉल रेकॉर्डिंगमधून येत आहे. […]

Mumbaitak
follow google news

औरंगाबाद: शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) सध्या शिव संवाद यात्रेच्या माध्यमातून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. मराठवाड्यातील जवळपास सर्वच आमदारांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) आपला नेता मानले आहे. आदित्य ठाकरेंच्या या शिव संवाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळताना पाहायला मिळत आहे. याचा प्रत्यय सध्या व्हायरल होत असलेल्या एका कॉल रेकॉर्डिंगमधून येत आहे. औरंगाबादचा एका शिवसैनिकाने बंडखोर आमदार संदिपान भूमरे (Sandipan Bhumre) यांना फोन करुन आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याबाबत माहिती दिली, त्यावेळी भूमरेंचा पारा चांगलाच चढला.

हे वाचलं का?

काय आहे ऑडीओ क्लिपमध्ये?

व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये स्वतःला शिवसैनिक सांगणारा एक तरुण, आदित्य ठाकरे यांची पैठणमध्ये निघालेल्या शिवसंवाद रॅलीची भुमरे यांना माहिती देत आहे. आदित्य यांना मोठा प्रतिसाद मिळत असून, तुम्हाला मतदान करणारे लोकं आज आदित्य ठाकरेंच्या सोबत असल्याचं हा शिवसैनिक म्हणत आहे.

त्यानंतर तुम्ही असे करायला नको होतं, म्हणताच भुमरे या तरुणावर चांगलेच भडकले. ‘उगाच शहाणपणा नको करू, कशासाठी फोन केला तू, संभाजीनगरचा आहे ना तू, मी आल्यावर तू ये तुला सांगतो काय आहे ते, असे म्हणत भुमरे चांगलेच संतापले. मात्र लगेच त्यांनी संयमाने बोलत आपणही यापेक्षा मोठी रॅली काढू म्हणत, तरुणाची समजूत काढत फोन ठेवला.

दरम्यान युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी औरंगाबादमध्ये शिवसंवाद यात्रा काढत बंडखोर आमदार संदीपान भुमरे यांच्या मतदारसंघात जाऊन शिवसैनिकांशी संवाद साधला. भुमरे यांच्या मतदारसंघात सुद्धा आदित्य ठाकरेंनी रॅली काढत सभा घेतली. यासभेला मोठी गर्दी उसळली होती.

आदित्य ठाकरे यांच्या सभेला कशी गर्दी झाली याबाबत एका शिवसैनिकांने भुमरे यांना फोनवरून माहिती देताच ते त्याच्यावर चांगलेच भडकले. याबाबत भुमरे आणि एका शिवसैनिकाची संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर अनेक आजी-माजी पदाधिकारी उद्धव ठाकरेंना सोडून जात आहेत. शिवसेनेची ही लढाई अगदी कोर्टापर्यंत पोहोचली आहे.

    follow whatsapp