पॉप सिंगर रिहाना पुन्हा वादात, टॉपलेस फोटोशूटमध्ये गणपतीचं पेंडंट

शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ट्विटने वादात सापडलेली पॉप सिंगर रिहाना आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होतेय. रिहानाने एक ट्विट केलंय, ज्यामध्ये ती टॉपलेस दिसतेय. पण तिने गळ्यात घातलेल्या नेकलेसमध्ये जे पेंडंट आहे, त्यात गणपती आहे. रिहानाने जे कॅप्शन दिलंय, त्यात असा कोणता आक्षेपार्ह उल्लेख नाही. पण टॉपलेस फोटोमध्ये हिंदू देवताला ठेवणं आक्षेपार्ह असल्याचं मत नेटकरी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:29 PM • 16 Feb 2021

follow google news

शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या ट्विटने वादात सापडलेली पॉप सिंगर रिहाना आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर ट्रोल होतेय.

हे वाचलं का?

रिहानाने एक ट्विट केलंय, ज्यामध्ये ती टॉपलेस दिसतेय. पण तिने गळ्यात घातलेल्या नेकलेसमध्ये जे पेंडंट आहे, त्यात गणपती आहे.

रिहानाने जे कॅप्शन दिलंय, त्यात असा कोणता आक्षेपार्ह उल्लेख नाही. पण टॉपलेस फोटोमध्ये हिंदू देवताला ठेवणं आक्षेपार्ह असल्याचं मत नेटकरी व्यक्त करतायत. रिहानाच्या या ट्विटखाली अनेकांनी आक्षेप व्यक्त केलाय.

एका यूजरने म्हटलंय,

रिहाना, सौंदर्य खुलवण्यासाठी धर्माचा वापर करणं थांबव. तुझ्या गळ्यातील नेकलेसमध्ये असलेला गणपती आमच्या हिंदूंसाठी अत्यंत पवित्र आहे.

दुसऱ्या यूजरने म्हटलंय,

आमचा धर्म हा तुझ्या सौंदर्यासाठी नाही. हा अपमान आहे.

आणखी एक जण म्हणतोय,

हे आक्षेपार्ह आहे. कोट्यवधी लोकांच्या भावना गणपतीशी जोडल्या गेलेल्या आहेत. अनेक जण गणेश चतुर्थी साजरी करतात. सॉरी रीरी, तू माझं मन दुखावलंस.

एकाने तर म्हटलंय, की मी मुस्लिम आहे, पण तरीही मलासुद्धा हे चुकीचंच वाटतंय.

ही तीच रिहाना आहे, जीने काही दिवसांपूर्वीच दिल्लीतील शेतकरी आंदोलनाविषयीची बातमी ट्विट करत म्हटलेलं, की आपण ह्याच्यावर काहीच का बोलत नाही? एका आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटीनं भारताच्या अंतर्गत मुद्द्यावर केलेल्या ट्विटमुळे हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडलं.

पण याआधी सुद्धा रिहाना वादात सापडलेली आहे. रिहानाच्या वर्च्युअल रनवे शो सॅवेज एक्स फेंटी मध्ये लाँजरी कलेक्शन दाखवण्यात आलेलं. यावेळी संगीत निर्मात्याने डूम हे गाणं वापरलं, ज्यात इस्लाम धर्मात कुराण समान मानल्या जाणाऱ्या हदीसचा उल्लेख आहे.

एखाद्या लाँजरी फॅशन शोमध्ये इस्लाम धर्मातील पवित्र गोष्टीचा उल्लेख केल्यानं सोशल मीडियावर टीकेची झोड उठली, त्यानंतर रिहानाला माफी मागावी लागली होती.

आता सुद्धा रिहानाने ट्विट केलेला हा फोटो, एका लाँजरी ब्रँडसाठी केलेल्या फोटोशूटसाठीचाच आहे. त्यामुळे याप्रकरणातही रिहाना माफी मागते का, हे पाहावं लागेल.

    follow whatsapp