मुंबईची खबर: म्हाडाची नवी लॉटरी! 31 लाखात मिळणार मुंबईत स्वप्नातलं घर... कोणत्या परिसरात फ्लॅट्स उपलब्ध?

मुंबई तक

• 05:04 PM • 20 Feb 2026

म्हाडा आता मुंबईतल्या वेगवेगळ्या वसाहतींमध्ये 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर तब्बल 118 फ्लॅट्सची विक्री करणार असल्याची बातमी समोर आली आहे.

31 लाखात मिळणार मुंबईत स्वप्नातलं घर...

31 लाखात मिळणार मुंबईत स्वप्नातलं घर...

Google CTA

बातम्या हायलाइट

point

मुंबईत म्हाडाची नवी लॉटरी!

point

31 लाखात मिळणार मुंबईत स्वप्नातलं घर...

point

कोणत्या परिसरात फ्लॅट्स उपलब्ध?

Mumbai News: जवळपास प्रत्येकाचं मुंबईत हक्काचं घर असल्याचं स्वप्न असतं. मात्र, घरांच्या वाढत्या किमतीमुळे अनेकांना मुंबईत त्यांच्या स्वप्नातलं घर घेणं शक्य होत नाही. म्हाडा आता मुंबईतल्या वेगवेगळ्या वसाहतींमध्ये 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर तब्बल 118 फ्लॅट्सची विक्री करणार असल्याची बातमी समोर आली आहे. याआधी झालेल्या तीन लॉटरी सोडतीनंतर न विकलेली म्हणजेच उर्वरित घरे आता प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) ने एकूण 120 घरांसाठी विक्री प्रक्रिया सुरू केली आहे असून 17 फेब्रुवारी 2026 पासून रजिस्ट्रेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे. 

हे वाचलं का?

'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर घरे उपलब्ध... 

म्हाडाच्या या योजनेअंतर्गत, घरांची किंमत 31 लाख रुपयांपासून सुरू होऊन 8 कोटी रुपयांपर्यंत आहे. मानखुर्द परिसरात सर्वात कमी किंमतीत म्हणजेच 31 लाख रुपयांत घरे उपलब्ध आहेत. तसेच, सर्वात महागडे फ्लॅट्स क्रीसेंट टॉवर, ताडदेव येथे असून त्यांची किंमत 8 कोटी रुपये असल्याची माहिती आहे. याव्यतिरिक्त, वडाळा, लोअर परळ आणि अंधेरी परिसरात सुद्धा या स्कीमअंतर्गत घरे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या सोडतीबाबत म्हाडाने स्पष्ट केलं की, 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या तत्त्वावर फ्लॅट्सची विक्री केली जाईल. तसेच, घर निश्चित केल्यानंतर 48 तासांच्या आत घराच्या एकूण किमतीच्या 10 टक्के रक्कम द्यावी लागेल. 

हे ही वाचा:  25 वर्षीय सुनेवर सासऱ्याची जबरदस्ती! महिला गाढ झोपेत असताना गुपचूप खोलीत शिरला अन् सकाळी भलतंच दृश्य...

म्हाडाच्या या स्कीमची विशेष बाब म्हणजे, तीन वेळा लॉटरी प्रक्रियेद्वारे उपलब्ध करून देऊनही या विक्री झाली नाही. त्यामुळे, हे फ्लॅट्स आता थेट विक्रीद्वारे नागरिकांसाठी खुली करण्यात आली असून यासाठी इच्छुक व्यक्तींनी त्वरित रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन म्हाडाने केलं आहे. 

हे ही वाचा: Govt Job: इस्त्रो (ISRO) मध्ये काम करण्याची संधी! काय आहे पात्रता? अप्लाय करण्याची शेवटची तारीख...

कोणत्या परिसरात किती घरे? 

शिंपोली कांदिवली - 8
चारकोप सेक्टर -8
कांदिवली - 1
अँटॉप हिल-वडाळा - 27
तुंगा पवई - 42
पीएमजीपी- मानखुर्द - 1
मालवणी मालाड - 1
गायकवाडनगर मालवणी-मालाड - 1 
विकास नियंत्रण नियमावली 33(5) (7) 33 (5) (7) अन्वये बोर्डाला मिळालेले फ्लॅट्स - 58 
घाटकोपर पूर्ण - 2
कन्नमवार नगर, विक्रोळी - 1
भायखळा - 6 
ताडदेव - 6 
लोअर परेल - 4 
सायन- 2 
JVPD अंधेरी पश्चिम - 7