Sagar Rana Murder : सुशील कुमारच्या पोलीस कोठडीत वाढ

मुंबई तक

• 01:52 PM • 29 May 2021

२३ वर्षीय पैलवान सागर राणाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. २३ मे रोजी दिल्ली पोलिसांनी सागरच्या हत्येनंतर फरार असलेला सुशील आणि त्याचा सहकारी अजयला अटक केली होती, यानंतर दिल्ली कोर्टाने त्यांना सहा दिवसांची कोठडी सुनावली होती. Sagar Rana Murder : सुशीलच्या सांगण्यावरुन सागरला मारहाण केली, […]

Mumbaitak
follow google news

२३ वर्षीय पैलवान सागर राणाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमारच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. २३ मे रोजी दिल्ली पोलिसांनी सागरच्या हत्येनंतर फरार असलेला सुशील आणि त्याचा सहकारी अजयला अटक केली होती, यानंतर दिल्ली कोर्टाने त्यांना सहा दिवसांची कोठडी सुनावली होती.

हे वाचलं का?

Sagar Rana Murder : सुशीलच्या सांगण्यावरुन सागरला मारहाण केली, अटकेतील आरोपीची पोलिसांकडे कबुली

या कोठडीची मुदत आज संपल्यानंतर दिल्ली पोलिसांनी सुशील कुमारला पुन्हा एकदा रोहिणी कोर्टात हजर केलं. सुशील आणि अजय पोलीस तपासात सहकार्य करत नसल्याचं सांगत दिल्ली पोलिसांनी तपासासाठी १० दिवसांची कोठडी मागितली. परंतू सरतेशेवटी कोर्टाने ४ दिवसांची कोठडी मान्य केली आहे. कोणताही व्यक्ती कायद्यापेक्षा मोठा नाही. परंतू प्रत्येक व्यक्तीच्या मुलभूत अधिकारांचं जनत झालं पाहिजे, असं म्हणत कोर्टाने दिल्ली पोलिसांची दहा दिवसांच्या कोठडीची विनंती फेटाळत ४ दिवसांची कोठडी मंजूर केली.

Sushil Kumar Arrested : ऑलिम्पिक पदक विजेता ते हत्येचा आरोपी, जाणून घ्या आतापर्यंत काय-काय घडलं?

दरम्यान आज झालेल्या सुनावणी दिल्ली पोलिसांच्या वकीलांनी सुशील हाच सागर राणाच्या हत्या प्रकरणातला मुख्य सूत्रधार आहे. सागर राणा आणि त्याच्या मित्रांना झालेल्या मारहाणी १८-२० लोकं सहभागी होते. यापैकी ८ व्यक्तींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. पोलिसांनी सुशील कुमारकडे असलेली परवानाधारक बंदुकही जप्त केली असून घटनास्थळावरुन मिळालेल्या पुराव्यांत सुशील सागरला झालेल्या मारहाणीत सहभागी असल्याचंही वकीलांनी कोर्टात सांगितलं. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात आता नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp