‘प्रकरण बंद करायचं असेल तर…’ सलमान खानला घातपाताची पुन्हा धमकी!

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानमागे असलेला संकटांचा डोंगर कमी होण्याचं काही नाव घेत नाही. सलमान खानला यापूर्वीही लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, त्यासाठी त्याला सुरक्षाही देण्यात आली होती. पण अलीकडेच सलमानच्या मॅनेजरला पुन्हा धमकीचा ई-मेल आला आहे, जो रोहित गर्गच्या नावाने पाठवण्यात आला आहे. 18 मार्च रोजी मिळालेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये सलमानला गँगस्टर गोल्डी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:19 PM • 19 Mar 2023

follow google news

हे वाचलं का?

बॉलीवूड सुपरस्टार सलमान खानमागे असलेला संकटांचा डोंगर कमी होण्याचं काही नाव घेत नाही.

सलमान खानला यापूर्वीही लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या, त्यासाठी त्याला सुरक्षाही देण्यात आली होती.

पण अलीकडेच सलमानच्या मॅनेजरला पुन्हा धमकीचा ई-मेल आला आहे, जो रोहित गर्गच्या नावाने पाठवण्यात आला आहे.

18 मार्च रोजी मिळालेल्या धमकीच्या ई-मेलमध्ये सलमानला गँगस्टर गोल्डी ब्रारशी बोलण्यास सांगितले आहे. तसं न केल्यास काहीतरी घडेल असा इशारा देण्यात आला आहे.

ई-मेलमध्ये लिहिलं, ‘गोल्डी ब्रारला तुझा बॉस म्हणजे सलमान खानशी बोलायचं आहे. त्याने मुलाखत पाहिली असेल, नसेल तर बघायला सांग.’

‘जर तुम्हाला प्रकरण बंद करायचं असेल तर, त्याला बोलायला सांगा. मी तुम्हाला वेळीच कळवलं आहे, पुढच्या वेळी झटका मिळेल.’

हा धमकीचा ई-मेल आल्यानंतर सलमान खानचे मॅनेजर प्रशांत गुंजाळकर यांनी गोल्डी ब्रार, लॉरेन्स बिश्रोई आणि रोहित गर्ग यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली.

सलमान खानला धमकी देण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही 2019 मध्ये लॉरेन्स बिश्रोईने त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.

शार्प शूटर्सनी सलमानच्या घराची आणि फार्महाऊसची तोडफोडही केली होती.त्यांनी मुंबईत एक खोली भाड्याने घेतली होती.

त्यांनी सलमानच्या सुरक्षा रक्षकाशी मैत्री केली होती, पण सलमानसोबत असलेल्या कडक सुरक्षेमुळे हा प्लान फसला.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp