Sambhaji Bhide: ‘समुद्रात महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका’

Sambhaji Bhides controversial statement regarding shivaji maharajs monument: जुन्नर: छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) जयंती ही हिंदू पंचांगाच्या तिथीनुसार साजरी झाली पाहिजे. असं मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरूजी (Sambhaji Bhide) यांनी मांडले आहे. जुन्नर येथे शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांच्या गडकोट मोहिमेच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना भिडे यांनी थेट असं म्हटलं की, ‘अरबी समुद्रात […]

Mumbai Tak

मुंबई तक

01 Feb 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:07 AM)

follow google news

Sambhaji Bhides controversial statement regarding shivaji maharajs monument: जुन्नर: छत्रपती शिवाजी महाराजांची (Shivaji Maharaj) जयंती ही हिंदू पंचांगाच्या तिथीनुसार साजरी झाली पाहिजे. असं मत शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संभाजी भिडे गुरूजी (Sambhaji Bhide) यांनी मांडले आहे. जुन्नर येथे शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांच्या गडकोट मोहिमेच्या सांगता सभेत ते बोलत होते. यावेळी बोलताना भिडे यांनी थेट असं म्हटलं की, ‘अरबी समुद्रात महाराजांचे स्मारक उभारण्याचा बेशरमपणा करू नका.’ असं म्हणत भिडेंनी राज्य सरकारला सुनावलं आहे. (sambhaji bhides controversial statement regarding shivaji maharajs monument in arabian sea)

हे वाचलं का?

जगाचा बाप हा हिंदुस्थान असून याचे उत्तर सारे देश देतील. असे संभाजी भिडे यांनी म्हटले. यावेळी बोलताना संभाजी भिडे यांना अश्रूही अनावर झाले.

हिंदुस्थानाला तीन बाधा..म्लेंच्छ बाधा, आंग्ल बाधा आणि गांधी बाधा- संभाजी भिडे गुरुजींच विधान

नेमकं काय म्हणाले संभाजी भिडे

‘शिवछत्रपतींनी भारतीय पंचागानुसार शिवशक सुरू केला. आता शिव छत्रपतींचं स्मारक समुद्रात करणार.. कोट्यवधी रुपये खर्च करणार. पण ते स्मारक करण्याचा बेशरमपणा करू नका. राज्याभिषेक झाल्यानंतर हिंदवी राज्य स्थापन झालं. त्यानंतर शिवशक स्थापन झालं. त्यामुळे ताबडतोब देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा लक्षात घ्यावं की, शिवशकाचा उल्लेख हा पाहिजेच. जयंती याचा उल्लेख पाहिजे.’

‘जिजामाता या 12 जानेवारीला जन्मलेल्या नाहीत. तर पौर्णिमेला जन्मला आहेत. ती तिथीच मानली पाहिजे. अशा खूप गोष्टी आहेत. सुरुवातीला एवढं शिकवूया.. भारतमातेची लेकरं राज्य करतायेत.. बघू काय करतात ते. पण शिवरायांच्या काळजातील हिंदुस्थान निर्माण करायचं काम आपण करतो त्या मार्गानेच येऊ शकतं. अन्य मार्ग नाही.’

‘जगाचा बाप कोण याचे उत्तर सारे देश परस्पर देतील. अमेरिका देईल, रशिया देईल. हे सगळे हरामखोर आहेत.’ असं पुन्हा एकदा वादग्रस्त विधान संभाजी भिडे यांनी केलं आहे.

‘भिडे सारख्या घाणेरड्या लोकांचा ‘तोच’ उद्देश, यांची तुलना मी कसाबशी करतो’, जलील यांची तुफान टीका

संभाजी भिडे आणि वाद

संभाजी भिडे आणि वाद हे समीकरण आता काही नवं राहिलेलं नाही. आतापर्यंत अनेकदा त्यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य करुन नवनवे वाद निर्माण केले आहेत. तसेच महिलांविषयी देखील त्यांनी टोकाची मतं सार्वजनिक कार्यक्रमात अनेकदा केली आहेत. ज्यावरुन त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.

काही महिन्यांपूर्वीच एका महिला पत्रकाराला टिकली लाव मग बोलेन असं संभाजी भिडे म्हणाले होते. ज्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं होतं. त्यावर अनेकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मात्र, असं असताना देखील संभाजी भिडे यांच्या भूमिकेत काही बदल झालेला नाही. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांनी नवं वादग्रस्त विधान केल्याने चर्चेत आले आहे.

    follow whatsapp