Sambhajiraje उद्धव ठाकरेंच्या भेटीला, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग

मुंबई तक

19 May 2022 (अपडेटेड: 01 Mar 2023, 08:55 AM)

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) वर्षा या ठिकाणी पोहचलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजेंमध्ये काय चर्चा होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. संभाजीराजेंनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच त्यांना शरद पवारांनीही पाठिंबा दिला आहे. अशात आता संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहचणं हे सूचक आहे. यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत. या […]

Mumbaitak
follow google news

संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chatrapati) वर्षा या ठिकाणी पोहचलेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संभाजीराजेंमध्ये काय चर्चा होणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. संभाजीराजेंनी राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी अपक्ष लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. तसंच त्यांना शरद पवारांनीही पाठिंबा दिला आहे. अशात आता संभाजीराजेंनी उद्धव ठाकरेंच्या भेटीला पोहचणं हे सूचक आहे. यावरून चर्चा सुरू झाल्या आहेत.

हे वाचलं का?

या दोन नेत्यांमध्ये सुमारे ३५ ते ४० मिनिटं चर्चा झाली. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी वर्षा बंगल्यावर चर्चा झाली आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेना पाठिंबा देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या महाविकास आघाडीकडे १६९ आमदार आहेत. शिवसेना ५५, राष्ट्रवादी ५४, काँग्रेस ४४, इतर पक्ष ८ आणि अपक्ष ८ असं महाविकास आघाडीकडे संख्याबळ आहे. तर भाजपकडे ११३ आमदारांचं संख्याबळ आहे. भाजपचे १०६ आमदार, रासप १, जनसुराज्य १ आणि अपक्ष ५ आमदार अशा एकूण ११३ आमदार भाजपकडे आहेत.

संभाजीराजे राज्यसभेची आगामी निवडणूक ही अपक्ष म्हणून लढवत असले तरी नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी दुसरी मोठी घोषणा केली ती म्हणजे, त्यांच्या नव्या ‘स्वराज्य’ या संघटनेची त्यांनी घोषणा केली आहे. याच संघटनेबाबत ते असंही म्हणाले की, ‘उद्या स्वराज्य ही संघटना राजकीय पक्षात रूपांतर झाल तर वावगं समजू नका.’ त्यामुळे आता संभाजीराजे यांच्या अधिकृतरित्या राजकीय वाटचालीला सुरुवात झाली आहे यात शंका नाही. अशात त्यांनी आज वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतलेली मुख्यमंत्र्यांची भेट चर्चेचा विषय ठरली आहे.

राज्यसभा निवडणूक अपक्ष लढणार असल्याचं संभाजीराजेंनी जाहीर केलं. त्यानंतर सर्वपक्षीय नेत्यांना पाटिंबा देण्याचं आवाहनही केलं. त्यांच्या या आवाहनानंतर शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची शिल्लक राहिलेली मतं संभाजीराजेंना देण्यात येतील असं जाहीर केलं आहे. तर शिवसेनेकडून मात्र सहाव्या जागेवर उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. अशात संभाजीराजेंना शिवसेनेनं ऑफर दिल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे.

महाराष्ट्रात विधानसभेचे एकूण आमदार 288 आहेत. आता उदाहरणाखातर आपण समजू राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक लागतेय, तर यामध्ये 1 अॅड करायचा म्हणजे झाले 8. आता एकूण आमदार 288 भागिले 8 करायचे, म्हणजे झाले 36. या 36 मध्ये पुन्हा 1 अॅड करायचा, म्हणजे झाले 37. ज्या उमेदवाराला राज्यसभेवर निवडून जायचं आहे त्याला किमान 37 मतांची गरज आहे.

जेव्हा मतदान होतं तेव्हा या आमदारांना त्यांचं प्राधान्य देता येतं. म्हणजे A B C असे 3 उमेदवार असतील तर पहिलं प्राधान्य C ला दुसरं प्राधान्य A ला आणि तिसरं प्राधान्य B ला असं देता येतं.

राज्यसभेचा खासदार म्हणून निवडून यायला किमान 37 मतं तरी गरजेची असतात. आता या उमेदवारांमध्ये कुणालाच 37 मतं मिळाली नाहीत, तर सगळ्यात कमी मतं असलेली व्यक्ती बाद होते. उदाहरणाखातर C ला सगळ्यात कमी मतं मिळाली, तर ती बाद होणार आणि तिच्यासाठी मतदान केलेल्यांनी A आणि B ला जे प्राधान्य दिलं होतं ते पुढे पकडलं जातं. त्यानुसार A आणि B मध्ये ज्याला 37 मतं मिळतील ती व्यक्ती राज्यसभेची खासदार म्हणून निवडली जाते.

    follow whatsapp