Santosh Deshmukh Case Beed : संतोष देशमुख प्रकरणात SIT कडून डॉक्टर ताब्यात, 'या' आरोपीला मदत केल्याचा संशय

डॉक्टर संभाजी वायबसे यांच्यासह दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. वायबसे हे केज तालुक्यातील कासारीचे असून, त्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे.

Mumbai Tak

मुंबई तक

04 Jan 2025 (अपडेटेड: 04 Jan 2025, 09:56 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख प्रकरणी दोघे ताब्यात

point

डॉ. संभाजी वायबसे यांची चौकशी

point

आरोपीला पळून जाण्यात मदत केल्याचा संशय

बीडच्या मयत संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आणखी तीन जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. बीड एस. आय. टी. च्या तपासात मोठी अपडेट समोर आली असून, सरपंच हत्याकांडातील संशयित डॉ.संभाजी वायबसे याला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. डॉक्टर संभाजी वायबसे यांच्यासह दोघांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. डॉ. वायबसे हे केज तालुक्यातील कासारीचे असून, त्यांचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा पोलिसांना संशय आहे. एसआयटीकडून आरोपींची कसून चौकशी केली जात आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा >>वाल्मिक कराडला आहे 'हा' आजार... नेमकं काय होतं त्यात?

डॉक्टर संभाजी वायबसेने मुख्य आरोपी असलेल्या आरोपी सुदर्शन घुलेला फरार होण्यासाठी मदत केल्याचा देखील संशय व्यक्त केला जात आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये जो प्रमुख आरोपी सुदर्शन घुले आहे, याला पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांमध्ये वायबसे यांचे नाव आहे. याच अनुषंगाने एस.आय. टी. प्रमूख पोलीस उपमहानिरीक्षक डॉक्टर बसवराज तेली आर्थिक गुन्हे शाखा सीआयडी विभाग पुणे यांच्या अध्यक्षतेखाली एस. आय. टी. ची स्थापना करण्यात आली होती. ते दोन दिवसापासून बीड आणि केजमध्ये तळ ठोकून आहेत. याच दरम्यान एसआयटी चे प्रमुख डॉक्टर  बसवराज तेली यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या आदेशान्वये वेगवेगळ्या भागात संशयित लोकांची कसून चौकशी केली जात आहे. 

सुदर्शन घुले कोण?

संतोष देशमुख यांचं अपहरण करणारा आणि टॉर्चर करुन त्यांचा खून करणारा मुख्य आरोपी आहे सुदर्शन घुले. आरोपी संतोष घुले अद्याप फरार आहे. सुदर्शन घुलेची पार्श्वभूमी आपण पाहिली तर, त्याचं वय 27 वर्ष असून, तो बीडमधील केज तालुक्यातील टाकळी गावचा आहे. त्याचं शिक्षण झालं जेमतेम सातवीपर्यंत. त्यानंतर सुदर्शनला छंद लागला भाईगिरीचा. 

Suresh Dhas : करुणा मुंडेंच्या गाडीत 'तो' पिस्तूल कुणी ठेवला? सुरेश धस यांनी थेट नावच सांगितलं, म्हणाले...

राजकीय नेते मंडळींच्या सोबत राहायचं. नेते आणि पंटर सांगतील ती कामं करायची, त्यातूनच पैसे मिळवायचे. नेत्यांच्या सांगण्यावरुन एखाद्याला धमकावणं तसंच मारहाण आणि चोरी करण्याचेही आरोप त्याच्यावर असल्याचं गावातील केजमधील लोक सांगतात. म्हणजे कायदेशीर भाषेत तो गुन्हेगारच होता. सुदर्शन घुलेला भाईगिरीचा नाद, त्याचं स्वप्नही तसंच होतं. एकुलता एक असलेला सुदर्शन घुलेचं कुटुंब म्हणजे घरी फक्त त्याची आई. सुदर्शनच्या वडिलांचा मृत्यू झालेला असून, घरी 2 ते 4 चार एकर कोरडवाहू जमीन असल्याची माहिती आम्हाला बीडमधील सुत्रांकडून मिळाली.