वाल्मिक कराडला आहे 'हा' आजार... नेमकं काय होतं त्यात?

मुंबई तक

What is sleep apnea: वाल्मिक कराड याला स्लीप एपनिया हा आजार असल्याचं समोर आलं आहे. जाणून घ्या ही नेमकी व्याधी काय आहे आणि त्याची लक्षणं काय असतात.

ADVERTISEMENT

वाल्मिक कराड याला स्लीप एपनिया हा आजार
वाल्मिक कराड याला स्लीप एपनिया हा आजार
social share
google news

बातम्या हायलाइट

point

वाल्मिक कराडला नेमकी कोणती व्याधी आहे?

point

वाल्मिक कराडने कोर्टाकडे काय केली मागणी

point

स्लीप एपनिया नेमका आहे आजार?

बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणी सध्या सीआयडी चौकशी सुरू आहे. ज्या प्रकरणी वाल्मिक कराड याला अटकही करण्यात आली. पण अटकेनंतर वाल्मिक कराड याने एक अजब मागणी कोर्टाकडे केली होती. आपल्यासोबत 24 तास एक सहाय्यक हा तुरुंगात असावा असं वाल्मिकने म्हटलं होतं. पण अशी मागणी नेमकी वाल्मिकने का केली आणि त्याचं कारण काय हे आपण आधी जाणून घेऊया. (walmik karad suffers from sleep apnea what exactly is going on)

वाल्मिक कराडने आपल्या याचिकेत कोर्टाला असं सांगितलं की, त्याला स्लीप एपनिया ही व्याधी आहे. ज्यासाठी त्याला तज्ज्ञांकडून ऑटो CPAP (continuous positive airway pressure)उपकरण देण्यात आले आहे. हेच उपकरण चालविण्यासाठी वाल्मिकला तुरुंगात 24 तास एक सहाय्यक हवा आहे.

हे ही वाचा>> Mumbai Tak Chavdi : "धनंजय मुंडे पंकजा मुंडेंची फाईल घेऊन माझ्या घरी...", अंजली दमानीयांचं खळबळजनक विधान

दरम्यान, स्लीप एपनिया हा नेमका आजार काय आहे आणि त्यामध्ये जीवाला किती धोका असतो हेच आपण जाणून घेऊया. 

स्लीप एपनिया म्हणजे काय?

स्लीप एपनिया हा झोपेचा विकार आहे ज्याची व्याख्या झोपेदरम्यान वरच्या वायूमार्गाचे पूर्ण बंद होणे अशी आहे. ज्यामुळे श्वासोच्छवासात व्यत्यय येतो. परिणामी, तुमच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होते, ज्यामुळे झोप आणि आरोग्याच्या गुंतागुंत निर्माण होतात.

हे वाचलं का?

    follow whatsapp