Walmik Karad गोत्यात, विष्णू चाटेची मोठी कबुली.. CID ची रिमांड कॉपी मुंबई Tak च्या हाती
Walmik Karad extortion: अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना खंडणीसाठी वाल्मिक कराड याने धमकी दिल्याचं आता समोर आलं आहे. याबाबतचा कबुली जबाब हा आरोपी विष्णू चाटे याने दिला असून तो सीआयडीच्या रिमांड कॉपीमध्ये नमूद करण्यात आला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात

आरोपी विष्णू चाटेने दिली मोठी कबुली

2 कोटीच्या खंडणीसाठी वाल्मिक कराडने धमकी दिल्याचा आरोप
Walmik Karard: बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि अवादा कंपनीकडे केलेली खंडणीची मागणी याचा सध्या सीआयडी तपास करत आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराड हा अटकेत आहेत. तर त्याचवेळी गुन्ह्यातील आरोपी विष्णू चाटे यांने दिलेल्या एका कबुलीमुळे वाल्मिक कराड हा आणखी गोत्यात आला आहे. वाल्मिक कराडच्या कोठडीसाठी CID जी रिमांड कॉपी सादर केली होती. ती आता मुंबई Tak च्या हाती लागली आहे. ज्यामध्ये विष्णू चाटेने वाल्मिक कराडबाबत दिलेल्या कबुलीचा उल्लेख आहे.
विष्णू चाटे याच्या मोबाइलवरून वाल्मिक कराड याने धमकी दिली होती आणि त्याने 2 कोटींच्या खंडणीची मागणी केली असल्याचा आरोप अवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांने पोलीस तक्रारीत केला आहे. तर त्याचवेळी विष्णू चाटे यानेही आपल्या कबुली जबाबत असं म्हटलं आहे की, वाल्मिक कराड यांना फोन लावून अवादा कंपनीचे शिंदे यांचेशी बोलणे करुन दिले.
विष्णू चाटेने दिली कबुली, CID ची रिमांड कॉपी जशीच्या तशी...
उपरोक्त विषयान्वये सविनय सादर कि. यातील फिर्यादी नामे सुनिल केदु शिंदे वय ४२ वर्ष व्यवसाय खाजगी नोकरी, रा. बीड यांनी दिनांक ११.१२.२०२४ रोजी पोलीस ठाणे केज येथे हजर येऊन तोंडी सांगून फिर्याद दिली की, मी वरील ठिकाणचा राहणार असून मागील 1 वर्षापासून अवादा एनर्जी प्राव्हेट लिमीटेड कंपनीत प्रकल्प अधिकारी म्हणून काम पाहत आहे.
हे ही वाचा>> Walmik Karad: वाल्मिक कराडला तुरुंगात 24 तास हवा 'हा' व्यक्ती, कारण 'ती' मशीन...
माझ्याकडे बीड जिल्हयातील केज तालुक्यातील विविध ठिकाणी पवन उर्जा प्रकल्पाचं मांडणी व उभारणीचे काम आहे. मस्साजोग या ठिकाणी प्रकल्पाचे मुख्य कार्यालय असून त्या ठिकाणी माझे सोबत विविध प्रकल्पाचे अधिकारी काम पाहत आहेत. माझे सहकारी शिवाजी नाना थोपटे हे जमीन अधिग्रहण विभागाचे काम पाहतात. आमचे पवन उर्जा प्रकल्पाचे प्रमुख म्हणून श्री. सतिश कुमार हे महाराष्ट्रात काम पाहतात.