Walmik Karad: वाल्मिक कराडला तुरुंगात 24 तास हवा 'हा' व्यक्ती, कारण 'ती' मशीन...
Walmik Karad sleep apnea: वाल्मिक कराड याने वैद्यकीय गोष्टींचा हवाला देत तुरुंगात 24 तास सहाय्यकाची मागणी केली आहे. यासाठी त्याने कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

वाल्मिक कराडने कोर्टात दाखल केली याचिका

पाहा वाल्मिक कराडने कोणती मागणी केली

वाल्मिक कराडला तुरुंगात 24 तास सहाय्यक का हवा?
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीच्या कोठडीत असलेल्या वाल्मिक कराडबाबत आता एक नवी माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराड याने आता केज न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेत त्याने त्याच्या सहाय्यकाला 24 तास सोबत ठेवण्याची मागणी केली आहे. त्याने यासाठी त्याच्या वैद्यकीय स्थितीचा हवाला दिला आहे. याबाबतचं वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिलं आहे.
'तुरुंगात 24 तास सहाय्यक द्या', वाल्मिक कराडची भलतीच मागणी
प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी) न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात कराड यांनी सांगितले की, त्याला स्लीप एपनियाचा त्रास आहे. ज्यासाठी त्याला तुरुंगात ऑटो CPAP (continuous positive airway pressure)उपकरण देण्यात आले आहे. पण त्याने असी मागणी केली आहे की, मशीन चालवण्यासाठी त्याला एका सहाय्यकाची 24 तास गरज आहे.
हे ही वाचा>> 'धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा?', राधाकृष्ण विखे-पाटलांचं चक्रावून टाकणारं उत्तर
दरम्यान, कोर्टाने या संदर्भात सध्या या प्रकरणाचा तपास करत असलेल्या सीआयडीला नोटीस बजावली आहे. तथापि, सीआयडी अधिकाऱ्यांनी या याचिकेबाबत बोलताना सांगितलं की, 'अशा प्रकारच्या विनंतीसाठी कोणतीही तरतूद नाही. या कारणास्तव या याचिकेला विरोध करण्यात येईल.'
त्याची वैद्यकीय स्थिती आणि वैद्यकीय उपकरणांसाठी तांत्रिक सहाय्याची आवश्यकता असल्याचे कारण देत कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. 31 डिसेंबर रोजी अटक करण्यात आलेल्या कराडला 14 जानेवारीपर्यंत सीआयडी कोठडी सुनावण्यात आली आहे.