Santosh Deshmukh Case MCOCA : संतोष देशमुख प्रकरणात मकोका दाखल, पण वाल्मिक कराड मात्र...

एकीकडे मोर्चे काढले जातायत, दुसरीकडे संतोष देशमुखांचे कुटुंबी टाहो फोडतायत तर या प्रकरणाचा तपास कुठवर आला हे कुणालाच माहिती नाहीये. याच मुद्द्याला धरून संतोष देशमुखांची लेक वैभवी देशमुख हीने यंत्रणांच्या तपासाबद्दल आज गंभीर सवाल उपस्थित केला होता.

Mumbai Tak

मुंबई तक

11 Jan 2025 (अपडेटेड: 11 Jan 2025, 04:33 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

संतोष देशमुख प्रकरणात मोठी अपडेट

point

प्रकरणातील 6 आरोपींवर मकोका दाखल

एसआयटीकडून मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये आता संतोष देशमुख खून प्रकरणात मकोका दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे आता आरोपी विष्णू चाटे, सुदर्श घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, सिद्धार्थ सोनवणे यांच्यावर कठोर कारवाई होण्याची चिन्ह आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून या आरोपींवर मकोका लावण्याची मागणी केली जात होती. संतोष देशमुख यांचे कुटुंबीय गेल्या अनेक दिवसांपासून न्याय कधी भेटेल या प्रतिक्षेत असताना ही कारवाई करण्यात आल्यामुळे आता कारवाईवर विश्वास निर्माण होणार असल्याची शक्यता आहे. 

हे वाचलं का?

वाल्मिक कराड हा सध्या 14 दिवसांच्या कोठडीत आहे. त्याच्यावरही मकोका लावण्याची मागणी वारंवार केली जात आहे. मात्र, वाल्मिक कराडवर मकोका दाखल करण्यात आलेला नाही. त्यामुळे खून प्रकरणाशी वाल्मिकचा संबंध अजूनही दाखवता आलेला नाही असंच चित्र आहे. 

हे ही वाचा >> Santosh Deshmukh Murder Case: आरोपी विष्णू चाटेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी! केज कोर्टात नेमकं काय घडलं?

एकीकडे मोर्चे काढले जातायत, दुसरीकडे संतोष देशमुखांचे कुटुंबी टाहो फोडतायत तर या प्रकरणाचा तपास कुठवर आला हे कुणालाच माहिती नाहीये. याच मुद्द्याला धरून संतोष देशमुखांची लेक वैभवी देशमुख हीने यंत्रणांच्या तपासाबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. 

हे ही वाचा >> Devendra Fadnavis : "शरद पवार चाणक्य, म्हणून...", पवारांनी RSS चं कौतुक केल्यानंतर काय म्हणाले फडणवीस?

वैभवी म्हणाली, "माझ्या वडिलांची हत्या झाली, त्याला आता महिना उलटला. पोलीस प्रशासन त्यांच्या पद्धतीनं काम करतंय, पण तपास कुठपर्यंत आला, कोणत्या पद्धतीनं तपास केला जातोय याबद्दल आम्हाला काहीच माहिती नाही. एक आरोपी अजूनही सापडलेला नाही. त्यामुळे आम्हाला प्रश्न पडलाय की, तपास आमच्यापासून का लपवला जातोय. या केसमध्ये काय चाललंय हे देशमुख कुटुंबीयालाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला कळलं पाहिजे. त्यामुळे या केसच्या तपासाबद्दल आम्हाला वेळोवेळी कळवण्यात यावं"

    follow whatsapp