उद्धव ठाकरेंची मोठी खेळी : संतोष बांगर यांना आस्मान दाखविण्यासाठी टारफे-मगर मैदानात

मुंबई तक

• 10:03 AM • 29 Aug 2022

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांना आस्मान दाखविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यात विस्कळीत झालेली शिवसेना सावरण्यासाठी ठाकरे यांनी यापूर्वी हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पक्षात घेतले आहे. त्यानंतर आता ठाकरे यांनी आणखी एक मोठी खेळी खेळत गत निवडणुकीतील बांगर यांचे दोन प्रतिस्पर्धी संतोष टारफे आणि अजित मगर […]

Mumbaitak
follow google news

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांना आस्मान दाखविण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे चांगलेच आक्रमक झाले आहेत. हिंगोली जिल्ह्यात विस्कळीत झालेली शिवसेना सावरण्यासाठी ठाकरे यांनी यापूर्वी हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांना पक्षात घेतले आहे. त्यानंतर आता ठाकरे यांनी आणखी एक मोठी खेळी खेळत गत निवडणुकीतील बांगर यांचे दोन प्रतिस्पर्धी संतोष टारफे आणि अजित मगर यांना पक्षात घेतले आहे. दोघांनीही ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे बांगर यांच्यासमोर मोठे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिंदे गटातील आमदारांना शिव्याशाप देणारे बांगर स्वतः अखेरच्या क्षणी बंडामध्ये सहभागी झाले होते. विशेष अधिवेशनावेळी अगदी अखेरच्या बांगर क्षणी शिंदे गटाला पाठिंबा जाहीर केला होता. इतकेच नाही तर मुंबईत येवून शक्तिप्रदर्शन करत थेट त्यांनी थेट उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. बांगर हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुखही असल्याने त्यांच्या बंडखोरीनंतर हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना विस्कळीत झाली होती. त्यानंतर आता संतोष बांगर यांना आस्मान दाखविण्यासाठी ठाकरे यांनी कंबर कसली आहे.

दसरा मेळावा शिवसेनेचा म्हणजे आमचाच होणार, उद्धव ठाकरे यांची गर्जना

कोण आहेत संतोष टारफे?

संतोष टारफे हे हिंगोलीच्या राजकारणातील मोठे नाव समजले जाते. काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव मोघे यांचे ते जावई आहेत. 2009 मध्ये टारफे यांनी बहुजन समाजवादी पक्षाकडून कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून नशिब आजमावले होते. त्यानंतर काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांनी टारफे यांना काँग्रेसमध्ये आणले. तसेच 2014 मध्ये विधानसभेचे तिकीट देवून निवडून देखील आणले. मात्र 2019 च्या विधानसभा निवडणुकीत टारफेंचा पराभव झाला. ते थेट तिसऱ्या स्थानावर फेकले गेले.

शिवाय सातव यांच्या निधनानंतर हिंगोली काँग्रेसमधील गटबाजीमुळे टारफे मागील अनेक दिवसांपासून नाराज होते. मध्यंतरी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी टारफे यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. परंतु तिथेही त्यांना डावल्यामुळे त्यांच्या नाराजीत आणखी भर पडली. शिवाय सातव यांच्या पत्नी आणि आमदार प्रज्ञा सातव यांच्याकडूनही डावलले जात असल्यास आरोप टारफे यांनी केला होता. प्रज्ञा सातव यांच्या अशा भूमिकेमुळे इतरही कार्यकर्ते टारफे यांच्याशी वेगळ्या पद्धतीने वागत असल्याचा दावा टारफेंनी केला होता.

मोदी सरकारच्या आश्वासनांचं शरद पवारांकडून ‘ऑपरेशन’; पत्रकार परिषदेत यादीच काढली

अजित मगरही शिवसेनेत :

संतोष टारफे यांच्या सोबत संतोष बांगर यांचे दुसरे प्रतिस्पर्धी आणि शेतकरी नेते अजित मगर यांनीही आज शिवसेनेत प्रवेश केला. अजित मगर यांनी 2019 मध्ये वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी त्यांनी जवळपास ६७ हजार मत घेवून बांगर यांच्यापुढे कडवे आव्हान उभे केले होते. त्यामुळे आता आगामी निवडणुकीतही अजित मगर मैदानात उतरल्यास बांगर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    follow whatsapp