सातारा : जिवंत मांडूळ सापाची विक्री करणाऱ्या तिघांना अटक

साताऱ्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जिवंत मांडूळ सापाची विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिरवळ-लोणंद रोडवर सापळा रचत आरोपींना अटक केली आहे. लोणंद येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जवळ हे आरोपी सापाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे पाच वाजल्याच्या दरम्यान, एका दुचाकीवर तिघेही आरोपी संशयास्पदरित्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:33 PM • 19 Jan 2022

follow google news

साताऱ्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जिवंत मांडूळ सापाची विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिरवळ-लोणंद रोडवर सापळा रचत आरोपींना अटक केली आहे.

हे वाचलं का?

लोणंद येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या जवळ हे आरोपी सापाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. संध्याकाळी ठरल्याप्रमाणे पाच वाजल्याच्या दरम्यान, एका दुचाकीवर तिघेही आरोपी संशयास्पदरित्या घुटमळताना वनविभागाला आढळले.

यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या संशयितांना थांबवून चौकशी केली असता त्यांच्याकडे मांडूळ जातीचे साप आढळून आले. वनविभागाने याप्रकरणात रविंद्र कंगाळे, अनिकेत यादव आणि संतोष काटे या तीन आरोपींना अटक केली आहे. मांडूळ जातीचा साप हा वन्यजीव संरक्षक अधिनियम च्या शेड्यूल ४ अंतर्गत येतो. या सापाला मारणं किंवा कोणत्याही इतर कामासाठी त्याची विक्री करणं हे कायद्याने गुन्हा आहे. वनविभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

सातारा : गर्भवती वनरक्षक महिलेला माजी सरपंचाकडून लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल

    follow whatsapp