कोल्हापूर उत्तर पोटनिवडणूक : सतेज पाटील माणसं खाणारा माणूस – चंद्रकांत पाटलांची टीका

मुंबई तक

• 12:09 PM • 23 Mar 2022

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आता वातावरण तापायाल सुरुवात झाली आहे. भाजपने आज आपले उमेदवार सत्यजित कदम यांचा अर्ज दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी उपस्थित असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका करताना, सतेज पाटील माणसं खाणारा माणूस असल्याचं म्हटलं आहे. कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेने पाच निवडणुका जिंकल्या आहेत. तरीही […]

Mumbaitak
follow google news

कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आता वातावरण तापायाल सुरुवात झाली आहे. भाजपने आज आपले उमेदवार सत्यजित कदम यांचा अर्ज दाखल करताना जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी उपस्थित असलेल्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर टीका करताना, सतेज पाटील माणसं खाणारा माणूस असल्याचं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

कोल्हापूर उत्तर मतदारसंघात शिवसेनेने पाच निवडणुका जिंकल्या आहेत. तरीही या पोटनिवडणुकीत हा मतदारसंघ शिवसेनेला काँग्रेसला सोडावा लागला आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी आणि अस्वस्थता आहे. पालकमंत्री सतेज पाटलांनी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला, यातूनच ते शिवसेनेच्या बोकांडी बसण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसैनिकांनी हे ओळखावं. सतेज पाटील माणसं खाणारा माणूस आहे, हेच यातून सिद्ध होतंय. भविष्यातला धोका लक्षात घेऊन शिवसैनिकांनी त्यांच्यापासून सावध रहावं असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करत असताना आज भाजपतर्फे जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडीक यांचं दसरा चौकात आगमन झालं. यानंतर शाहू महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन जंगी मिरवणूकही काढली. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटलांनी कोल्हापूर जिल्हयातील कोणत्याही आमदारानं राजीनामा दयावा, त्यानंतर होणार्‍या पोटनिवडणुकीत आपण विजयी होऊन दाखवू, याचा पुनरूच्चार केला.

कोल्हापूरमधील विकासकामांवरुन महाविकास आघाडी सरकारला घेरताना चंद्रकांत दादांनी, थेट पाईपलाईनचं पाणी अजुनही जनतेला का मिळत नाही याचं उत्तर सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी दयावं असं आव्हान दिलं आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष झाली आहेत. यापैकी ५० वर्ष केंद्रात आणि राज्यातही काँग्रेसचं आघाडी सरकार होतं. भाजपला केवळ पाच वर्षच सत्ता मिळाली. त्यामुळं काँग्रेस आघाडी सरकारनं ५० वर्षांत केलेला विकास आणि भाजपचा पाच वर्षांचा लेखाजोखा मांडण्यास आपण कधीही बिंदू चौकात येण्यास तयार आहोत. सतेज पाटील यांनी सुध्दा या खुल्या चर्चेत सहभागी व्हावं, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

    follow whatsapp