पुणे : सुरक्षा रक्षकाचं कृत्य! अंघोळ करणाऱ्या महिलेचे खिडकीतून काढले फोटो, व्हिडीओ

मुंबई तक

• 07:05 AM • 24 Nov 2021

पुणे स्टेशन परिसरात असलेल्या शासकीय निवासस्थानामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. स्टेशनजवळ असलेल्या शासकीय निवासस्थानामध्ये एक महिला आंघोळ करत होती. यावेळी सुरक्षारक्षकाने फोटो काढले. या प्रकरणी आरोपी सुरक्षारक्षकास अटक करण्यात आली आहे. अशोक तुकाराम चव्हाण (वय 26) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी सुरक्षारक्षकाचं नाव आहे. मुलीला कारमधून पळवलं; पंढरपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिकमध्ये केला बलात्कार या […]

Mumbai Tak
Google CTA

पुणे स्टेशन परिसरात असलेल्या शासकीय निवासस्थानामध्ये एक धक्कादायक प्रकार घडला आहे. स्टेशनजवळ असलेल्या शासकीय निवासस्थानामध्ये एक महिला आंघोळ करत होती. यावेळी सुरक्षारक्षकाने फोटो काढले. या प्रकरणी आरोपी सुरक्षारक्षकास अटक करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

अशोक तुकाराम चव्हाण (वय 26) असं अटक करण्यात आलेल्या आरोपी सुरक्षारक्षकाचं नाव आहे.

मुलीला कारमधून पळवलं; पंढरपूर, कोल्हापूर, औरंगाबाद, नाशिकमध्ये केला बलात्कार

या घटनेबद्दल पोलिसांनी माहिती दिली. पुणे स्टेशनजवळ असलेल्या शासकीय निवासस्थानामधील बाथरुमध्ये सोमवारी दुपारच्या सुमारास 26 वर्षीय महिला आंघोळ करीत होती. त्याचवेळी बाथरूममधील खिडकीच्या बाहेरील बाजूला आरोपी अशोक चव्हाण उभा होता.

अंघोळ करणाऱ्या महिलेचे आरोपीने फोटो आणि व्हिडिओ काढण्यास सुरुवात केली. खिडकीच्या बाहेर कुणीतरी असल्याचं महिलेला हालचालीवरून जाणवलं. महिलेनं बघितलं असता तिला खिडकीच्या जवळ एक व्यक्ती दिसून आली. त्यानंतर महिलेनं आरडाओरड करण्यास सुरुवात केली.

Rape Case: 38 वर्षीय महिलेवर 24 वर्षीय तरुणाकडून बलात्कार, पुण्याहून परळीला आणून
महिलेवर अत्याचार

महिलेचा आवाज ऐकून आसपास असलेल्या नागरिक धावले आणि त्यांनी आरोपीला पकडलं. त्यानंतर संबंधित महिलेनं पोलिसांत तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. घटनेबद्दल आरोपीकडे चौकशी सुरू असल्याचे बंडगार्डन पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.