शीतल म्हात्रे व्हिडीओ प्रकरण : पुण्यातील एका तरुणाला अटक

मुंबई तक

14 Mar 2023 (अपडेटेड: 23 Mar 2023, 08:10 PM)

Sheetal Mhatre viral Video case : माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकास सुर्वे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात पोलिसांकडून धरपकड सुरू असून, मुंबई, कल्याणपाठोपाठ पुण्यातून एका तरुणाला अटक करण्यात आलं आहे. युवा सेना पदाधिकारी साईनाथ दुर्गे यांच्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. शिवसेना-भाजपच्या आशीर्वाद यात्रेदरम्यानचा आमदार प्रकाश सुर्वे […]

Mumbaitak
follow google news

Sheetal Mhatre viral Video case : माजी नगरसेविका शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकास सुर्वे व्हायरल व्हिडीओ प्रकरणात पोलिसांकडून धरपकड सुरू असून, मुंबई, कल्याणपाठोपाठ पुण्यातून एका तरुणाला अटक करण्यात आलं आहे. युवा सेना पदाधिकारी साईनाथ दुर्गे यांच्यानंतर ही अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांत पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे.

हे वाचलं का?

शिवसेना-भाजपच्या आशीर्वाद यात्रेदरम्यानचा आमदार प्रकाश सुर्वे आणि माजी नगरसेविकास शीतल म्हात्रे यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. या व्हिडीओने राजकारण तापलं असून, ठाकरे गट आणि शिंदे गटात यावरून आरोप प्रत्यारोप होत आहेत.

शीतल म्हात्रे यांनी याप्रकरणी दहिसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करत दहिसर पोलिसांनी तपास सुरू केला. व्हिडीओ व्हायरल प्रकरणात पोलिसांनी मुंबई, कल्याण, पुण्यातून आरोपींना अटक केली आहे.

Viral Video मुळे चर्चेत आलेल्या शीतल म्हात्रे कोण आहेत?

गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला अशोक मिश्रा, मानस कुवर यांना अटक केली होती. त्यानंतर रवींद्र चौधरी आणि विनायक डायरे यांना पोलिसांकडून अटक करण्यात आली.

आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय साईनाथ दुर्गेंना अटक

युवा सेना कोअर कमिटीचे सदस्य आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेल्या साईनाथ दुर्गे यांनाही पोलिसांनी सोमवारी दुपारी अटक केली. साईनाथ दुर्गे यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली.

Sainath Durge : शीतल म्हात्रे प्रकरण; आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय अटकेत

पुण्यातून कुणाला करण्यात आली अटक?

साईनाथ दुर्गे यांना अटक केल्यानंतर पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. अक्षय धनदार असं पुण्यातून अटक करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे. 13 मार्च रोजी त्याला अटक करण्यात आली. अक्षय धनदारने शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वेचा व्हिडीओ शिवसेना ग्रुपवर शेअर केल्याचा आरोप आहे.

Sheetal Mhatre: ‘आम्ही त्यांना फोडून काढतो’, व्हिडीओवरून रुपाली पाटलांचा चढला पारा

विनायक डायरे चालवतो मातोश्री पेज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कल्याणमधून अटक करण्यात आलेला विनायक डायरे हा फेसबुकवरील मातोश्री पेज चालवतो. शीतल म्हात्रे यांनी केलेल्या आरोपानुसार मातोश्री या पेजवरून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आणि त्यानंतर युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी तो व्हायरल केला.

    follow whatsapp