बाळासाहेबांच्या आत्म्याला समाधान नसेल, उद्धव साहेबांनी आत्मपरीक्षण करावं : कदमांचा सल्ला

शिवसेनेचेच दोन मेळावे, दोन्ही ठिकाणी भगवे झेंडे, दोन्ही ठिकाणी बाळासाहेबांचे फोटो, हे 57 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडत आहे. खरतंर हे घडायला नको होतं अशी खंत शिंदे गटाचे नेते रामदास कदम व्यक्त केली. ते खेडमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आत्मपरिक्षणही करण्याचा सल्ला दिला. तर आज पक्ष वाचला असता : रामदास कदम […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 03:15 AM • 03 Oct 2022

follow google news

शिवसेनेचेच दोन मेळावे, दोन्ही ठिकाणी भगवे झेंडे, दोन्ही ठिकाणी बाळासाहेबांचे फोटो, हे 57 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा घडत आहे. खरतंर हे घडायला नको होतं अशी खंत शिंदे गटाचे नेते रामदास कदम व्यक्त केली. ते खेडमध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आत्मपरिक्षणही करण्याचा सल्ला दिला.

हे वाचलं का?

तर आज पक्ष वाचला असता :

रामदास कदम यावेळी म्हणाले, मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झगडणारी शिवसेना, या घोषवाक्याने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेला जन्म दिला होता. त्या मराठी माणसामध्येच फूट पाडण्याचं काम झालेलं आहे. उभी फूट पडलेली आहे. शिवसेना प्रमुखांचं स्वप्नच भंग पावलेलं आहे. म्हणून उद्धवजींनी शरद पवारांना सोबत घेण्यापेक्षा आपल्या आमदारांना गेट आउट केलं नसतं, तर आज पक्ष वाचला असता.

आपल्या आमदारांना गेटआऊट म्हणून सांगायचं, त्यामुळे हे सर्व घडलं आहे. हे सर्व घडल्यानंतर आपलं पाप लपविण्यासाठी इतरांना गद्दार आणि खोके असं बदनाम काम करण्याचं काम सुरू आहे. जनता दुधखुळी नाही, सर्वांना कळतं वास्तव काय आहे ते, अशा शब्दांत कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

हे कोणालाच शोभदायक नाही – रामदास कदम

आज जे काही दोन दोन मेळावे होताहेत ते आम्हाला सगळ्यांना शोभादायक नाही, कोणालाच नाही. जे नको व्हायला होतं ते घडतंय महाराष्ट्रात. मी याबाबत समाधानी नाही दुःखी आहे, हे अगदी मी प्रामाणिकपणे सांगेन. बाळासाहेबांच्या आत्म्याला देखील समाधान लागत नसेल. याचं आत्मपरीक्षण उद्धव साहेबांनी केलं पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत असल्याचं रामदास कदम यावेळी म्हणाले.

त्यावेळी तुम्हीही आला नाही आणि तुमचा आदित्यही नाही… :

एकनाथ शिंदे मागच्या तीन महिन्यात ज्या तडफेने काम करत आहेत हे सर्वजण पाहत आहेत. विशेषतः ते निर्णय घेत आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघेही जनतेच्याहिताचे निर्णय घेत आहेत जे मागच्या अडीच – तीन वर्षांत होऊ शकले नाही. कोकणावर जेव्हा महासंकट आलं तेव्हा शरद पावरांसारखी 82 वर्षांची व्यक्ती आली, पण ज्या कोकणाने शिवसेना मोठी केली त्या कोकणवासीयांचे अश्रू पुसण्यासाठी आपण आला नाहीत. आपण कोरोनाच्या भीतीने घरीच थांबलात, तुमचा आदित्यही नाही आला, वाईट त्याचं वाटतंय उद्धवजी, असेही कदम म्हणाले.

    follow whatsapp