Video : भास्कर जाधव २० वर्षांनी पुन्हा बनले ट्रक ड्रायव्हर!

गुहागर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गुहागचे आमदार भास्कर जाधव हे आज जरी आमदार म्हणून काम करत असले तरीही कधीएकेकाळी त्यांनी ट्रक चालवून उदरनिर्वाह केला आहे. यातूनच त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली होती. बुधवारी तब्बल २० वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा ट्रकचं स्टेरिंग हात घेतलं अन् आठवणींना उजाळा दिला. यावेळचा त्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत […]

Mumbai Tak

मुंबई तक

04 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:26 AM)

follow google news

गुहागर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे गुहागचे आमदार भास्कर जाधव हे आज जरी आमदार म्हणून काम करत असले तरीही कधीएकेकाळी त्यांनी ट्रक चालवून उदरनिर्वाह केला आहे. यातूनच त्यांच्या आयुष्याची सुरुवात झाली होती. बुधवारी तब्बल २० वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा ट्रकचं स्टेरिंग हात घेतलं अन् आठवणींना उजाळा दिला. यावेळचा त्यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

हे वाचलं का?

नेमकं काय झालं?

भास्कर जाधव यांच्या एका कार्यकर्त्याने नवीन ट्रक घेतला आणि हा ट्रक दाखवण्यासाठी भास्कर जाधव यांच्या कार्यालयाजवळ आणला. आमदार जाधव यांनी तो ट्रक पाहिला, हारही घातला. पण यावेळी ट्रक चालवायचा मोह त्यांना आवरला नाही. त्यांनी थेट मुंबई गोवा महामार्गावर सात किलोमीटर अंतर ट्रक चालवला आणि ट्रक चालवण्याचा मनमुराद आनंद लुटला.

यावेळी आमदार जाधव यांनी अनेक जुन्या आठवणी सांगितल्या. आपण अनेक वर्ष लाईनला ट्रक चालविल्याचा उल्लेख त्यांनी केला. संपूर्ण महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, दिल्ली अशा राज्यांमध्ये ट्रक चालवला असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच आजच्या घडीला वाहनं चालवणं तंत्रज्ञानामुळे सोप्प झालं आहे. पण जुन्या काळी पाच गिअरचे ट्रक असायचे. मोठी स्टेअरिंग असायची. त्यामुळे वाहनं चालवणं कौशल्याचं काम होतं.

    follow whatsapp