‘निधी का दिला नाही?’; आदित्य ठाकरेंना सवाल करणाऱ्या सुहास कांदेंना शिवसेनेनं दाखवली ‘यादी’

मुंबई तक

23 Jul 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:54 AM)

शिंदे गटातील मनमाडचे आमदार सुहास कांदे यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंत्री असताना निधी दिला नाही, असा आरोप केला होता. या आरोपाला प्रत्यूत्तर देत शिवसेनेकडून निधी दिल्याचा पुरावा सादर करत कांदे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता कांदे यांच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे. आदित्य ठाकरे यांनी पक्षात फुट पडल्यानंतर आता राज्यभर […]

Mumbaitak
follow google news

शिंदे गटातील मनमाडचे आमदार सुहास कांदे यांनी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मंत्री असताना निधी दिला नाही, असा आरोप केला होता. या आरोपाला प्रत्यूत्तर देत शिवसेनेकडून निधी दिल्याचा पुरावा सादर करत कांदे यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता कांदे यांच्या भूमिकेकडे लक्ष राहणार आहे.

हे वाचलं का?

आदित्य ठाकरे यांनी पक्षात फुट पडल्यानंतर आता राज्यभर शिवसंवाद यात्रा काढली आहे. ही शिवसंवाद यात्रा शुक्रवारी नाशिक येथे पोहोचली होती. या दरम्यान शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. तसेच सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करत आदित्य ठाकरे यांना भेटणार असल्याची माहिती दिली.

सुहास कांदे यांचा ताफा शिवसेनेने अडवला गेला तेव्हा काय घडलं होतं?

मात्र, अदित्य ठाकरे यांना भेटण्यापूर्वीच शिवसैनिकांनी पिंपळगाव टोलनाक्याजवळ कांदे यांचा ताफा अडवला. यादरम्यान कांदे यांना शिवसैनिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. या गोंधळामधून कांदे यांना पोलीस बंदोबस्तात बाहेर पडावं लागलं.दरम्यान कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे अनेकदा निधीची मागणी केली असता आपल्याला आदित्य ठाकरे यांनी निधी दिला नाही, असा अरोप केला होता. या आरोपानंतर शिवसेना कम्युनिकेशन ट्विटर हॅन्डलवरुन एक पुरावा सादर करणारा ट्विट करण्यात आला आहे. `आमदार सुहास कांदे म्हणाले, आदित्य ठाकरे यांनी मतदारसंघासाठी एकही रुपया निधी दिला नाही, दिला असेल तर दाखवावा, मी राजीनामा देईन…हा पहा निधीचा तपशील. आता कांदे आपण राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरे जावे`, असे या ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे. या पत्रात आठ कोटींची सहा कामे मंजूर केल्याचे पुरावे सादर केले आहे.

पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय काय तपशील वाचा सविस्तर

यामध्ये मनमाड येथी श्री गुरुद्वारा हे पर्यटन स्थळ सुशोभिकरण करणे (५० लाख), वै. ह. भ. प. मास्तरबाबा देवस्थान खायदे (ता. मालेगाव) परिसर सुशोभिकरण (५० लाख), श्री. विरोबा महाराज देवस्थान साकुरी (नि) ता. मालेगाव येथे भक्तस निवास बांधकाम (५० लाख), प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत मालेगाव हद्दीतील सर्व्हे क्रमांक ५६/१ मोकळ्या जागेत महिलांसाठी उद्यान व जिमखाना (१.२५ कोटी), मंदीर परिसरात रस्ता व पेव्हर ब्लॅाक बसविणे (५० लाख), पिनाकेश्वर महादेव मंदिर जातेगाव येथे पायाभूत सुविधा उभारणे (४.७५ कोटी) असा आठ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यापैकी २.१५ कोटी निधी वितरीत करण्यात आला आहे.

असं या पत्रात नमूद आहे. सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यासह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर देखील गंभिर आरोप लावले होते. त्यांनी केलेल्या निधीबाबतीकच्या आरोपाला खोडून काढण्यासाठी पुरावा आदित्य ठाकरे यांच्याकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. आता या आरोपावर सुहास कांदे काय उत्तर देतात, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp