शिंदे गटातील 40 आमदारांना भाजपच सुरुंग लावणार : भास्कर जाधवांचा इशारा

मुंबई तक

• 04:08 AM • 13 Nov 2022

नालासोपारा : भाजपाने आमच्या घरात फूट पाडून 40 आमदार नेले. आता हे आमदार स्थिर राहू नये यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे भाजप लवकरच शिंदे गटातही सुरुंग लावणार आहे, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी दिला. ते नालासोपाऱ्यात माध्यमांशी बोलत होते. गुहागर मतदारसंघातील वस‌ई-विरार क्षेत्रातील रहिवासी, स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी […]

Mumbaitak
follow google news

नालासोपारा : भाजपाने आमच्या घरात फूट पाडून 40 आमदार नेले. आता हे आमदार स्थिर राहू नये यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे भाजप लवकरच शिंदे गटातही सुरुंग लावणार आहे, असा इशारा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी दिला. ते नालासोपाऱ्यात माध्यमांशी बोलत होते.

हे वाचलं का?

गुहागर मतदारसंघातील वस‌ई-विरार क्षेत्रातील रहिवासी, स्थानिक शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांचा संयुक्त जाहीर मेळावा नालासोपारा पूर्व येथे शनिवारी संपन्न झाला. यावेळी भास्कर जाधव आणि आमदार सुनील शिंदे यांनी मुंबई ते नालासोपारा लोकलने प्रवास करून कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावली. कार्यकर्त्यांच्या मेळाव्याआधी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

संताजी-धनाजींचा अर्थ कळतो का?

यावेळी जाधव यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली. तसंच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचाही समाचार घेतला. बावनकुळे यांनी शिंदे-फडणवीस यांना संताजी-धनाजीची उपमा दिली. यावर बोलताना जाधव संताजी-धनाजींचा अर्थ कळतो का? असा संतप्त सवाल केला.

जाधव म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांना पकडल्यानंतर 27 वर्षे महाराजांच्या मावळ्यांनी मराठ्यांच्या स्वराज्याचे रक्षण केले.मोघलांच्या गादीचा कळस कापून आणला. त्यात अग्रगण्य संताजी आणि धनाजी हे होते. पण आपल्या राज्यात तर आपल्याच सत्तेला पायउतार करणारे शिंदे आणि फडणवीस कसे संताजी धनाजी? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

    follow whatsapp