MNS Candidate list: मध्यरात्री मोठी घडामोड, BMC साठी मनसेची पहिली यादी आली समोर.. पाहा कोणाला मिळालं तिकीट

मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवारांना अर्ज भरण्यास अवघे काही तास शिल्लक असताना मनसेने पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पाहा कोणाकोणाला दिलं आहे पहिल्या यादीत स्थान.

Mumbai Tak

मुंबई तक

• 12:25 AM • 30 Dec 2025

follow google news

मुंबई: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) रणांगणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS)आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. पक्षाने एकूण 33 जागांसाठी उमेदवारांची नावे घोषित केली असून, यात अनेक जुने चेहरे तसेच नवे कार्यकर्ते सामील आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज(30 डिसेंबर 2025) संपत असताना मनसेने वेळीच ही यादी प्रसिद्ध केली आहे.

हे वाचलं का?

मनसेच्या या यादीत विविध भागांतील जागांचा समावेश आहे. उत्तर मुंबईपासून ते दक्षिण मुंबई आणि उपनगरांपर्यंत पक्षाने आपले उमेदवार उतरवले आहेत. यादीत महिलांचे प्रमाण लक्षणीय असून, अनेक जागांवर स्थानिक कार्यकर्त्यांना संधी दिली गेली आहे.

मनसेच्या पहिल्या यादीतील उमेदवार :

  1. वॉर्ड क्र. १० – विजय कृष्णा पाटील  
  2. वॉर्ड क्र. ११ – कविता बागुल माने  
  3. वॉर्ड क्र. १८ – सदिच्छा मोरे  
  4. वॉर्ड क्र. २० – दिनेश साळवी  
  5. वॉर्ड क्र. २१ – सोनाली देव मिश्रा  
  6. वॉर्ड क्र. २७ – आशा विष्णू चांदर  
  7. वॉर्ड क्र. ३८ – सुरेखा परब लोके  
  8. वॉर्ड क्र. ५५ – शैलेंद्र मोरे  
  9. वॉर्ड क्र. ५८ – वीरेंद्र जाधव  
  10. वॉर्ड क्र. ६७ – कुशल सुरेश धुरी  
  11. वॉर्ड क्र. ६८ – संदेश देसाई  
  12. वॉर्ड क्र. ८१ – शबनम शेख  
  13. वॉर्ड क्र. ८४ – रूपाली दळवी  
  14. वॉर्ड क्र. ९८ – दिप्ती काते  
  15. वॉर्ड क्र. १०२ – अनंत हजारे  
  16. वॉर्ड क्र. १०६ – सत्यवान दळवी  
  17. वॉर्ड क्र. ११० – हरीनाक्षी मोहन चिराथ  
  18. वॉर्ड क्र. ११५ – ज्योती अनिल राजभोज  
  19. वॉर्ड क्र. १२९ – विजया गिते  
  20. वॉर्ड क्र. १३३ – भाग्यश्री अविनाश जाधव  
  21. वॉर्ड क्र. १३९ – शिरोमणी येशू जगली  
  22. वॉर्ड क्र. १४३ – प्रांजल राणे  
  23. वॉर्ड क्र. १५० – सविता माऊली थोरवे  
  24. वॉर्ड क्र. १५२ – सुधांशू दुनबाळे  
  25. वॉर्ड क्र. १८३ – पारूबाई कटके  
  26. वॉर्ड क्र. १९२ – यशवंत किल्लेदार  
  27. वॉर्ड क्र. १९७ – रचना साळवी  
  28. वॉर्ड क्र. २०५ – सुप्रिया दळवी  
  29. वॉर्ड क्र. २०७ – शलाका आरयन  
  30. वॉर्ड क्र. २०९ – हसीना महिमकर  
  31. वॉर्ड क्र. २१४ – मुकेश भालेराव  
  32. वॉर्ड क्र. २१७ – निलेश शिरधनकर  
  33. वॉर्ड क्र. २२६ – बबन महाडिक

एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (UBT) गटाने आपली उमेदवार यादी जाहीर केली असताना आता मनसेनेही आपले पहिले पत्ते उघड केले आहेत. सत्ताधारी महायुतीने (भाजप-शिवसेना) जागावाटप निश्चित करून प्रचाराला सुरुवात केली आहे, तर ठाकरे बंधूंच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे.

मनसेने गेल्या काही दिवसांत मुंबईत मराठी अस्मिता, स्थानिक मुद्दे आणि विकासाच्या आश्वासनांवर भर देत प्रचाराला जोर दिला आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसे यंदा मुंबई महापालिकेत आपले स्थान मजबूत करण्याच्या इराद्याने मैदानात उतरली आहे. उर्वरित जागांसाठी लवकरच दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

BMC निवडणुकीसाठी नामनिर्देशन दाखल करण्याची मुदत आज संपत असून, १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. मनसेच्या या यादीमुळे मुंबईतील निवडणूक रणांगण आणखी रंगतदार झाले आहे.

    follow whatsapp