वसई विरार महापालिका 2015 च्या निवडणुकीत बहुजन आघाडीचा डंका, इतिहास घ्या जाणून

Vasai-Virar Muncipal Corporation history : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार या महापालिकेचा इतिहास आणि अंतिम निकालाबाबतची एकूण माहिती ही पुढीलप्रमाणे नमूद करण्यात येत आहे.

vasai-virar muncipal corporation history

vasai-virar muncipal corporation history

मुंबई तक

• 09:56 PM • 29 Dec 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

वसई-विरार महानगरपालिका थोडक्यात इतिहास

point

वसई-विरार महानगरपालिका अंतिम निवडणूक निकाल 2015 

Vasai-Virar Muncipal Corporation history : राज्यात महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. तसेच अनेक पक्षांच्या उमेदवारीच्या याद्या जाहीर होऊ लागल्या आहेत. या निवडणुकीची तारीख देखील जाहीर झाली आहे. 15 जानेवारी रोजी मतदानाचा दिवस असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर होणार आहे. याच महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार या महापालिकेचा इतिहास आणि अंतिम निकालाबाबतची एकूण माहिती ही पुढीलप्रमाणे नमूद करण्यात येत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर

वसई-विरार महानगरपालिका थोडक्यात इतिहास

वसई-विरार महानगरपालिका ही वसई, विरार, नालासोपारा आणि नवघर-माणिकपूर या चार नगरपरिषदांच्या एकत्रीकरणातून आणि 53 ग्रामपंचायतींच्या समावेशातून निर्माण झाली. या महापालिकेची स्थापना ही 3 जुलै 2009 रोजी झाली होती. महानगरपालिकेने शहराच्या विकासासाठी विविध योजना राबवल्या आहेत, ज्यात परिवहन सेवा पाणीपुरवठा, स्वच्छता आणि शिक्षण यांचा समावेश आहे. ही महापालिका MMR अंतर्गत क्षेत्रात येते. यामुळे या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होतो.

वसई-विरार महानगरपालिका अंतिम निवडणूक निकाल 2015 

वसई-विरार महानगरपालिका अंतिम निवडणूक ही 2015 मध्ये झाली होती. या निवडणुकीत बहुजन आघाडीने प्रचंड यश मिळवलं होतं. त्यांनी एकूण 115 पैकी 106 जागांवर विजयी मिळवला होता. शिवसेनेने 5 जागा, काँग्रेसने 1 जागा, भाजपने 1 जागा. राष्ट्रवादीला खाते देखील खोलता आलं नाही आणि अपक्षांनी 2 जागा जिंकल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.

या बागात जनगणनेनुसार लोकसंख्या ही सुमारे 12.22 लाख होती. आज याच ठिकाणी सुमारे आज अंदाजे 23 लाखांहून अधिक नागरिक राहतात. वसई-विरार महानगरपालिकेचा भाग 311 चौ. कि.मी. क्षेत्रात व्यापलेला आहे. तसेच हा भाग मुंबई मेट्रोपोलिटन भागाचा, महत्वाचा भाग हा आहे.

हे ही वाचा : 'जिथं अशोक चव्हाण तिथं आम्ही', असंख्य मुस्लिम बांधवांचा अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

वसई विरार महापालिकेत 29 प्रभाग असून, 115 सदस्य संख्या आहे. यापैकी 58 जागा या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती आणि अनुसूचीत जमातींसाठी प्रत्येकी 5 जागा आरक्षित आहेत. यात प्रत्येकी 2 महिलांसाठी आरक्षित जागा ठेवण्यात आल्या आहेत. तसेच यापैकी 74 जागांवर सर्वसाधारण प्रवर्गातील जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

    follow whatsapp