मातोश्रीवर खडाजंगी, अनिल परब बैठकीतून निघून गेले, वरुण सरदेसाईंसोबत मोठा वाद; नेमकं काय घडलं?

Mumbai Mahanagar Palika Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवड अंतिम टप्प्यात असताना, मातोश्रीवर झालेली ही खडाजंगी ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उमेदवारीवरून निर्माण झालेल्या नाराजीचा परिणाम निवडणुकीत होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Mumbai Mahanagar Palika Election 2026

Mumbai Mahanagar Palika Election 2026

ऋत्विक भालेकर

29 Dec 2025 (अपडेटेड: 29 Dec 2025, 09:32 AM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

मुंबई महानगरपालिका : मातोश्रीवर खडाजंगी, अनिल परब बैठकीतून निघून गेले;

point

'त्या' वॉर्डवरुन वरुण सरदेसाईंसोबत मोठा वाद

Mumbai Mahanagar Palika Election 2026 : मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारी आणि जागावाटपावरून शिवसेना ठाकरे गटात अंतर्गत मतभेद उफाळून आल्याचे चित्र समोर आले आहे. मातोश्रीवर रविवारी (दि.28) रात्री पार पडलेल्या महत्त्वाच्या बैठकीत मोठा वाद झाला असून, या वादाचे केंद्रबिंदू ठरले ते शिवसेना नेते अनिल परब आणि आमदार वरुण सरदेसाई. जागावाटपावरून दोघांमध्ये जोरदार खडाजंगी झाली असून, वाद इतका टोकाला गेला की अनिल परब यांनी थेट बैठक सोडून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.

हे वाचलं का?

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पश्चिम येथील वॉर्ड क्रमांक 95 मधील उमेदवारी हा या वादाचा मुख्य मुद्दा ठरला. या प्रभागातून अनिल परब यांच्या गटाकडून शेखर वैंगणकर यांना उमेदवारी देण्याचे आधी निश्चित झाले होते. मात्र, ऐन वेळेला ही उमेदवारी रद्द करत श्रीकांत सरमळकर यांचे जावई आदिक शास्त्री यांना तिकीट देण्यात आल्याने अनिल परब प्रचंड नाराज झाले.

आदिक शास्त्री यांना उमेदवारी देण्याची शिफारस आमदार वरुण सरदेसाई यांनी केल्याचे समजते. याच मुद्द्यावरून परब आणि सरदेसाई यांच्यात जोरदार वाद झाला. बैठकीदरम्यान दोघांमध्ये तीव्र वाद झाला आणि अखेर अनिल परब यांनी संताप व्यक्त करत बैठक अर्धवट सोडून बाहेर पडल्याची माहिती आहे. मातोश्रीवर झालेली ही घटना पक्षातील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आणणारी ठरली आहे.

दरम्यान, या वादाला केवळ महापालिका उमेदवारीपुरते मर्यादित न ठेवता त्यामागे मागील विधानसभा निवडणुकीतील जुन्या मतभेदांची पार्श्वभूमी असल्याचेही बोलले जात आहे. मागील विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये काही मुद्द्यांवर मतभेद निर्माण झाले होते, त्याचीच किनार या ताज्या वादाला असल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगितले जाते. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवड अंतिम टप्प्यात असताना, मातोश्रीवर झालेली ही खडाजंगी ठाकरे गटासाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उमेदवारीवरून निर्माण झालेल्या नाराजीचा परिणाम निवडणुकीत होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली उमेदवार यादी

प्रभाग क्रमांक ५४- अंकित प्रभू

प्रभाग क्र. ५९- शैलेश फणसे

प्रभाग क्र. ६० - मेघना विशाल काकडे माने

प्रभाग क्र. ६१ - सेजल दयानंद सावंत

प्रभाग क्र. ६२ - झीशान चंगेज मुलतानी

प्रभाग क्र. ६३ - देवेंद्र (बाळा) आंबेरकर

प्रभाग क्र. ६४ - सबा हारून खान

प्रभाग क्रमांक ४०- सुहास वाडकर

प्रभाग क्रमांक २०६- सचिन पडवळ

प्रभाग क्रमांक ९३ - रोहिणी कांबळे

प्रभाग क्र. १०० - साधना वरस्कर

प्रभाग क्र. १५६ - संजना संतोष कासले

प्रभाग क्र. १६४ - साईनाथ साधू कटके

प्रभाग क्र. १६८ - सुधीर खातू वार्ड

प्रभाग क्र. १२४ - सकीना शेख

प्रभाग क्र. १२७ - स्वरूपा पाटील

प्रभाग क्र- ८९- गितेश राऊत

प्रभाग क्र- १४१ - विठ्ठल लोकरे

प्रभाग क्र - १४२ - सुनंदा लोकरे

प्रभाग क्रमांक १३७- महादेव आंबेकर

प्रभाग क्र-१३८- अर्जुन शिंदे

प्रभाग १६७ - सुवर्णा मोरे

प्रभाग १५०- सुप्रदा फातर्फेकर

प्रभाग क्र ९५ - चंद्रशेखर वायंगणकर

प्रभाग क्र २१५- किरण बालसराफ

प्रभाग क्र २१८- गीता अहिरेकर

प्रभाग क्र २२२- संपत ठाकूर

प्रभाग क्र २२५- अजिंक्य धात्रक

शिवसेना ठाकरेंच्या यादीत नेत्यांच्या मुलांना उमेदवारी

विनायक राऊत , सुनील प्रभू , हारून खान , प्रकाश फातर्पेकर, अशोक धात्रक

सुनील प्रभू - अंकित प्रभू (मुलगा )

विनायक राऊत - गीतेश राऊत (मुलगा)

हारून खान - सबा खान (मुलगी )

अशोक धात्रक - अजिंक्य धात्रक (मुलगा)

प्रकाश फातर्पेकर- सुपद्रा फातर्पेकर (मुलगी )

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मुंबई महानगरपालिका : ठाकरेंची पहिली उमेदवार यादी, सुनील प्रभू आणि विनायक राऊतांच्या मुलाला मैदानात उतरवलं

 

 

    follow whatsapp