‘देशद्रोही म्हणाल, तर जीभ हासडून टाकू’ : ठाकरेंकडून CM शिंदेंच्या वक्तव्याचा समाचार

मुंबई तक

05 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:59 PM)

Uddhav Thackeray Speech in Khed : खेड : कालपरवा मिंधे बोलले की, बरं झालं आमचं देशद्रोह्यांसोबतच चहापान टळलं. मग घातला धुडगूस सगळ्यांनी. त्यानंतर बोलले, नाही नाही, तसं नाही, मी तुम्हाला उद्देशून बोललो नव्हतो. अरे बोलू कसं शकशील, बोललास तर जीभ हासडून टाकू. कारण आम्ही देशद्रोही नाहीच आम्ही देशप्रेमी आहोत. हे मी मुख्यमंत्री नाही तर मी […]

Mumbaitak
follow google news

Uddhav Thackeray Speech in Khed :

हे वाचलं का?

खेड : कालपरवा मिंधे बोलले की, बरं झालं आमचं देशद्रोह्यांसोबतच चहापान टळलं. मग घातला धुडगूस सगळ्यांनी. त्यानंतर बोलले, नाही नाही, तसं नाही, मी तुम्हाला उद्देशून बोललो नव्हतो. अरे बोलू कसं शकशील, बोललास तर जीभ हासडून टाकू. कारण आम्ही देशद्रोही नाहीच आम्ही देशप्रेमी आहोत. हे मी मुख्यमंत्री नाही तर मी मिंधे म्हणून बोलतोय, असं म्हणतं शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला. (Shivsena UBT chief uddhav thackeray answer to cm eknath shinde in khed speech)

उद्धव ठाकरे यांचा आज (रविवारी) खेडमध्ये ‘शिवगर्जना मेळावा’ पार पडला. यावेळी माजी आमदार संजय कदम यांचा पक्षप्रवेशही पार पडला. याच मेळाव्यामध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोग, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली.

Shiv Sena ची स्थापना निवडणूक आयोगाच्या नाही, माझ्या वडिलांनी केली : ठाकरेंनी ठणकावलं

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“महाविकास आघाडीचं सरकार चांगलं चाललं होतं. मग बिघडलं कुठे? माशी शिंकली कुठे? माशी एकाच ठिकाणी शिंकली, आज जसं राजन साळवी, बाकीचे आपले आमदार आहेत, नितीन देशमुख यांनी तर भर सभेत सांगितलं की, कसा त्यांचा छळ केला. अनिल परब आहेत, एक तोतरा थर्माकॉलचा हातोडा घेऊन येतो. पण खरा हातोडा तुला पेलेल का? आता स्वत:च्या डोक्यावर पडायची वेळ आली. केवळ छळायचं. राजन साळवींच्या घरी धाड. घराचं मोजमाप घेतात. आता परत १३ की १५ तारखेला कुटुंबियांना बोलावलं आहे. राजन साळवी काय देशद्रोही आहेत का?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी यावेळी केला.

‘बाम लाव्याने ठाण्याच्या वेड्याच्या…’, भास्कर जाधवांची कदमांवर टीका

काय म्हटलं होतं एकनाथ शिंदे यांनी?

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर टीका करताना आम्ही चहापानाला गेलो असतो तर महाराष्ट्र द्रोह झाला असता, असं म्हटलं होतं. यावर बोलताना शिंदे म्हणाले, जे त्यांचे मंत्री तुरुंगात गेले, हसिना पारकर, दाऊदची बहिण. तिला चेक दिला ज्यांनी देशद्रोह केला, त्यांचा राजीनामा घेण्याचीही धमक नव्हती, बरं झालं, त्यांचे साथीदार अजित पवार आहेत आणि त्यांच्यासोबत चहा पिण्याची वेळ आमची टळली. बरं झालं, असं शिंदे म्हणाले होते.

    follow whatsapp