Yuvasena : प्रस्थापित नेत्यांच्या मुलांना आदित्य ठाकरेंचा दणका

ऋत्विक भालेकर

05 Jan 2023 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:26 AM)

(Aditya thackeray announce new appointment in Yuvasena) मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवासेनेची नवी कार्यकारिणी गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये ठाकरेंनी प्रस्थापित आणि निष्ठावंत नेत्यांच्या मुलांना, कार्यकर्त्यांना दणका दिला आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव वगळता एकाही आमदार, खासदार किंवा प्रस्थापित नेत्यांच्या मुलांना […]

Mumbaitak
follow google news

(Aditya thackeray announce new appointment in Yuvasena)

हे वाचलं का?

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवासेनेची नवी कार्यकारिणी गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आली. या नियुक्त्यांमध्ये ठाकरेंनी प्रस्थापित आणि निष्ठावंत नेत्यांच्या मुलांना, कार्यकर्त्यांना दणका दिला आहे. गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांचा मुलगा विक्रांत जाधव वगळता एकाही आमदार, खासदार किंवा प्रस्थापित नेत्यांच्या मुलांना संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळे युवासेनेत प्रचंड नाराजीचा सूर आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर देखील एकनिष्ठ राहिलेले खासदार राजन विचारे, आमदार सुनिल शिंदे, राजन साळवी, माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि इतर महत्वाच्या नेत्यांच्या मुलांना आज जाहीर करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये संधी देण्यात आलेली नाही. त्यामुळेच पक्षात नाराजीची लाट असल्याची माहिती आहे.

कोणाला मिळालं स्थान?

आजच्या कार्यकारिणीमध्ये मुंबईतील तीन, कोकण एक आणि विदर्भातून एक अशा पाच जणांना संधी देण्यात आली आहे.

१) विक्रांत जाधव

२) निलेश महाले

३) सिद्धेश धाऊसकर

४) हर्षल काकडे

५) धनश्री कोलगे

संधी न मिळालेली मोठी नावं :

१) धनश्री विचारे, राजन विचारेंची मुलगी

२) ऋषिकेश खैरे, चंद्रकांत खैरेचा मुलगा

३) सिद्धेश शिंदे, सुनिल शिंदेचा

४) जय सरपोतदार,

५) अजिंक्य धात्रक, माजी आमदारांचा मुलगा

६) शार्दूल म्हाडगुत, युवासेना

७) दीपक धातीर, नाशिक, नगरसेवक

८) योगेश निमसे, सहसचिव, केडीएमसी

९) अयोध्या पौळ-पाटील, युवासेना

१०) मंदार शिरसाट – सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख/ नगरपरिषद सदस्य

११) हर्षद कारकर, नगरसेवक

    follow whatsapp