मुंबईतल्या धारावीत १९ वर्षीय विवाहितेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार

मुंबईतल्या धारावीत (Dharavi) १९ वर्षांच्या विवाहितेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपींनी घटनेचा व्हीडिओही रेकॉर्ड केला आहे असंही पीडितेने सांगितलं. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. त्यानतर पोलिसांनी या भागातलं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली आहे. पतीची तक्रार करायला गेलेल्या महिलेवर भाईंदरमध्ये पोलिसाचा बलात्कार […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:54 AM • 14 May 2022

follow google news

मुंबईतल्या धारावीत (Dharavi) १९ वर्षांच्या विवाहितेवर चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार (Gang Rape) करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपींनी घटनेचा व्हीडिओही रेकॉर्ड केला आहे असंही पीडितेने सांगितलं. या प्रकरणी पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. त्यानतर पोलिसांनी या भागातलं सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरूवात केली आहे.

हे वाचलं का?

पतीची तक्रार करायला गेलेल्या महिलेवर भाईंदरमध्ये पोलिसाचा बलात्कार

ज्यांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केला ते आरोपी याच परिसरातले असतील असा संशय पोलिसांना आहे. या घटनेनंतर पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धारावीत १९ वर्षीय विवाहित महिला वास्तव्यास होती. पहाटेच्या सुमारास दोन आरोपींनी तिच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर चाकूचा धाक दाखवून या दोघांनी महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तोंड लपवण्यासाठी या दोघांनी त्यांचे चेहरे कापडाने झाकले होते. तसंच या घटनेचा व्हीडिओही चित्रित करण्यात आल्याचं पीडितेने सांगितलं आहे.

कौटुंबिक वाद सोडवण्यासाठी दिलं मांत्रिकाच्या ताब्यात, महिलेवर ७९ दिवस बलात्कार

ANI ने यासंदर्भात माहिती दिली आहे. १९ वर्षीय महिला तिच्या घरात होती. त्याचवेळी दोन अज्ञात पुरूष तिच्या घरात आले. चाकूचा धाक दाखवून या दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. तसंच या घटनेचा व्हीडिओही त्यांनी काढला असं धारावी पोलिसांनी पीडित महिलेने सांगितलं. या भागात जे सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत त्या आधारे आरोपींचा शोध घेतला जातो आहे असं पोलिसांनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp