धक्कादायक घटना; मुंबईतील या भागात एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले

गोवंडीतील पद्मनगर भागातील एक धक्कादाक घटना समोर आली आहे. एकाच परिवारातील चार जणांचे मृतदेह आढळले आहेत. सामूहिक आत्महत्येतून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्यापपर्यंत याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मृतकांमध्ये पती, पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी तपास करत असल्याची […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:05 AM • 29 Jul 2022

follow google news

गोवंडीतील पद्मनगर भागातील एक धक्कादाक घटना समोर आली आहे. एकाच परिवारातील चार जणांचे मृतदेह आढळले आहेत. सामूहिक आत्महत्येतून मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र अद्यापपर्यंत याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मृतकांमध्ये पती, पत्नी आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे.एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस घटनास्थळी तपास करत असल्याची माहिती मिळत आहे.

हे वाचलं का?

मुंबईतल्या गोवंडी भागातली धक्कादायक घटना

पती शकील जलील खान वय 34, पत्नी राबिया शकील खान वय 25, मुलगा सरफ़राज़ शकील खान वय 7 आणि मुलगी अतिफा खान वय 3, असे एकाच कुटुंबातील चौघांचे नावे आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिवाजी नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी चारही मृतदेह ताब्यात घेतले असून ते जवळच असलेल्या राजवाडी रुग्णलायत पोस्टमार्टमसाठी पाठवले आहेत. आता ही हत्या आहे की आत्महत्या याचा तपास पोलीस करत आहेत. आधी मुलांना विष देऊन नंतर पत्नी, पत्नीने आत्महत्या केल्याचा प्राथमिक संशय आहे.

नागपूर येथे देखील आठ दिवसाअगोदर अशीच एक घटना समोर आली होती. एका व्यावसायिकाने आपली पत्नी आणि मुलाला बाहेर जेवायला हॉटेलला नेलं होतं. परतत असताना कारमध्ये ज्वलनशील पदार्थ शिंपडून आग लावली होती. या आगीत व्यावसायिकाचा जागीच होरपडून मृत्यू झाला होता. तर पत्नी आणि मुलगा जखमी झाले होते. मात्र, उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला. व्यावसायिकाने आर्थिक विवनचनेतून आहत्महत्या केल्याचे समोर आले होते. आता या गोवंडी प्रकरणात काय कारण समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

    follow whatsapp