हिंदी राष्ट्रभाषा नाहीच! किच्चा सुदीपला पाठिंबा देत सोनू निगमने अजय देवगणला सुनावलं

किच्चा सुदीप आणि अजय देवगण यांच्या दोघांमध्ये हिंदीवरून रंगलेलं ट्विटर वॉर आपल्याला माहित आहेच. कर्नाटक तकला दिलेल्या मुलाखतीत किच्चा सुदीपने हिंदी राष्ट्रभाषा नाही अशा प्रकारचं एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अजय देवगणने ट्विट करत त्याला खडे बोल सुनावले. या दोघांचे ट्विट चांगलेच चर्चेत होते. अखेर यांचा वाद मिटला. मात्र हिंदी राष्ट्रभाषा नाही हे सांगत आता […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 02:35 PM • 03 May 2022

follow google news

किच्चा सुदीप आणि अजय देवगण यांच्या दोघांमध्ये हिंदीवरून रंगलेलं ट्विटर वॉर आपल्याला माहित आहेच. कर्नाटक तकला दिलेल्या मुलाखतीत किच्चा सुदीपने हिंदी राष्ट्रभाषा नाही अशा प्रकारचं एक वक्तव्य केलं होतं. त्यानंतर अजय देवगणने ट्विट करत त्याला खडे बोल सुनावले. या दोघांचे ट्विट चांगलेच चर्चेत होते. अखेर यांचा वाद मिटला. मात्र हिंदी राष्ट्रभाषा नाही हे सांगत आता सोनू निगमने एका मुलाखतीत अजय देवगणला खडे बोल सुनावले आहेत.

हे वाचलं का?

किच्चा सुदीप म्हणाला हिंदी राष्ट्रभाषा नाही! अजय देवगण भडकला आणि म्हणाला…

काय म्हटलं आहे सोनू निगमने?

“आपल्या भारतीय संविधानात कुठेही हे लिहिलेलं नाही की हिंदी राष्ट्रभाषा आहे. हिंदी ही सगळ्यात जास्त बोलली जाणारी भाषा असू शकते मात्र राष्ट्रभाषा नाही. तमिळ ही सर्वात जुनी भाषा आहे. संस्कृत आणि तमिळ यांच्यातली सर्वाधिक जुनी भाषा कोणती? यावरही वाद आहेत पण तरीही लोक म्हणतात की तमिळ ही जगातली सर्वात जुनी भाषा आहे.”

सोनू निगमने आपल्या म्हणणं मांडत असताना हेदेखील सांगितलं की आपल्या देशात हा वाद निर्माण करणं याला काही अर्थ नाही. कुणी कुठली भाषा बोलावी हे सांगण्याचा हक्क कुणालाही नाही. पंजाबी लोक पंजाबी बोलू शकतात. तमिळ लोक तमिळ भाषा बोलू शकतात. जर कुणाला इंग्रजीत बोलायचं असेल तर ते इंग्रजीतही बोलू शकतात. देशात अनेक गोष्टी चालल्या आहेत आता भाषेच्या नावावर देश तोडण्याची आवश्यकता नाही असंही सोनू निगमने म्हटलं आहे.

हिंदी नाही तर संस्कृत ही आपली राष्ट्रभाषा असली पाहिजे, कंगनाचं रोखठोक मत

काय आहे प्रकरण?

कर्नाटक तकला दिलेल्या मुलाखतीत किच्चा सुदीप म्हणाला की, ”हिंदी ही ही आपली राष्ट्रभाषा नाही. पॅन इंडिया सिनेमा कानडीतही तयार होत आहेत. याबाबत मी एक करेक्शन करू इच्छितो. हिंदी आता राष्ट्रभाषा नाही. आज बॉलिवूडमध्ये पॅन इंडिया सिनेमा तयार होत आहेत. बॉलिवूडमध्ये तेलुगू आणि तमिळ सिनेमांचे रिमेक बनत आहेत. तरीही त्यांचं स्ट्रगल संपलेलं नाही. आम्ही असे सिनेमा बनवतो जो जगभरात पाहिले जातात”

अजय देवगण काय म्हणाला होता?

किच्चा सुदीपने हे वक्तव्य केल्यानंतर हिंदीतला सुपरस्टार अजय देवगण चांगलाच भडकला. तो ट्विट करून सुदीपला म्हणाला की “किच्चा सुदीप, भावा तू म्हणतोस हिंदी राष्ट्रभाषा नाही मग तुमच्या मातृभाषेतले सिनेमा तुम्ही हिंदीत डब करून का रिलिज करता? हिंदी आमची मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषा आहे आणि नेहमीच राहिल. जन गण मन” असं ट्विट अजय देवगणने करत सुदीपला खडे बोल सुनावले होते. आता यावरच सोनू निगमने अजय देवगणला ऐकवलं आहे.

    follow whatsapp