‘शाळेत मुलं-मुली एकत्र बसवणं घातक,’ केरळ मुस्लिम लीगच्या नेत्याचं विधान

मुला-मुलींनी एकत्र बसण्याच्या आणि लिंग समानता गणवेशाच्या प्रस्तावावरून केरळच्या शाळांमध्ये वाद सुरू झाला आहे. मुस्लिम लीगचे सरचिटणीस (प्रभारी) पीएम ए सलाम यांनी मुली आणि मुलांनी शाळेत एकत्र बसण्याचा प्रस्ताव धोकादायक असल्याचे म्हटले आहे. केरळ सरकारच्या लैंगिक समानता धोरणाविरोधात बोलताना सलाम यांनी हे वक्तव्य केलं आहे. काय म्हणाले सलाम? सलाम म्हणाले, “सरकार लिंग समानता विद्यार्थ्यांवर लादण्याचा […]

Mumbai Tak

मुंबई तक

19 Aug 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 10:53 AM)

follow google news

मुला-मुलींनी एकत्र बसण्याच्या आणि लिंग समानता गणवेशाच्या प्रस्तावावरून केरळच्या शाळांमध्ये वाद सुरू झाला आहे. मुस्लिम लीगचे सरचिटणीस (प्रभारी) पीएम ए सलाम यांनी मुली आणि मुलांनी शाळेत एकत्र बसण्याचा प्रस्ताव धोकादायक असल्याचे म्हटले आहे. केरळ सरकारच्या लैंगिक समानता धोरणाविरोधात बोलताना सलाम यांनी हे वक्तव्य केलं आहे.

हे वाचलं का?

काय म्हणाले सलाम?

सलाम म्हणाले, “सरकार लिंग समानता विद्यार्थ्यांवर लादण्याचा प्रयत्न करत आहे. लैंगिक समानता विद्यार्थ्यांची दिशाभूल करेल, त्यामुळे आम्ही सरकारला ती परत घेण्यास सांगू.” ते एवढ्यावरच थांबले नाही आणि केरळ सरकारला विचारलं की मुली आणि मुलांनी वर्गात एकत्र बसण्याची काय गरज आहे? तुम्ही त्यांच्यावर जबरदस्ती का करत आहात किंवा अशा संधी का निर्माण करत आहात? त्यातून फक्त समस्या निर्माण होतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होईल, असं ते म्हणाले.

प्रस्ताव मागे घेण्याची मुस्लिम संघटनेची मागणी

राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये ‘लिंग समानता’ लादण्याचा प्रस्ताव मागे घेण्याची मागणीही मुस्लिम संघटनांनी सरकारकडे केली आहे. याआधी सोमवारी कोझिकोडमध्ये मुस्लिम संघटनांच्या बैठकीनंतर सय्यद रशीद अली शिहाब यांनी पत्रकारांना सांगितले होते की, हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. एलडीएफ सरकार आपली विचारधारा शैक्षणिक संस्थांमध्ये लागू करण्याचा प्रयत्न करत आहे.

नुकतेच केरळचे शिक्षण मंत्री व्ही शिवनकुट्टी यांनी या वादाबद्दल स्पष्टीकरण दिले होते आणि म्हटले होते की सरकार शाळांमध्ये लिंग समानता गणवेश लागू करणार नाही. दुसरीकडे, मुस्लीम लीगचे नेते एमके मुनीर यांनी या प्रकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. आता हा वाद कुठल्या टोकाला जातो, हे पहावं लागेल.

    follow whatsapp