सोलापूर : सराफ दुकानं फोडणाऱ्या जालना येथील चोरांना अटक

सराफ दुकानं फोडणाऱ्या जालना येथील चोरांना सोलापुरातील जोडभावी पेठ पोलिसांनी अटक केली आहे. जोडभावी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पूर्व मंगळवार पेठ, सराफ बाजार येथे सोन्याच्या दुकानात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू होता. या गुन्ह्यात वापरलेलं चारचाकी वाहन हे जालना येथील असल्याची माहिती समोर आली होती. या माहितीवरुन तपास करताना, पोलिसांनी जालना पोलिसांच्या मदतीने पुढची […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 07:27 AM • 11 Dec 2021

follow google news

सराफ दुकानं फोडणाऱ्या जालना येथील चोरांना सोलापुरातील जोडभावी पेठ पोलिसांनी अटक केली आहे. जोडभावी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पूर्व मंगळवार पेठ, सराफ बाजार येथे सोन्याच्या दुकानात झालेल्या चोरीच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास सुरू होता. या गुन्ह्यात वापरलेलं चारचाकी वाहन हे जालना येथील असल्याची माहिती समोर आली होती.

हे वाचलं का?

या माहितीवरुन तपास करताना, पोलिसांनी जालना पोलिसांच्या मदतीने पुढची सूत्र हलवली. आपल्या खबऱ्यांमार्फत जाळ रचत पोलिसांनी एका संशयिताला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. या चौकशीत ही चोरी जालना येथील कृष्णासिंग भादा, दिपकसिंह टाक आणि भारतसिंग बावरी यांनी केल्याचं कळलं.

Nashik Crime : दारुड्या मुलाकडून आईची सिमेंटच्या खांबावर डोकं आपटून हत्या

यानंतर पोलिसांनी तात्काळ पावलं उचलत या तिन्ही आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून सोलापूर येथील सराफ दुकानातून चोरी केलेली १० किलो ३४८ ग्रॅम वजनाची चांदी, गुन्ह्यात वापरलेली चारचाकी असा ८ लाख ७० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत गेला आहे.

    follow whatsapp