BJP MLA Death : उत्तर प्रदेशातील बरेलीच्या सर्किट हाऊसमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बैठकीदरम्यान, फरीदापूरचे भाजप आमदार डॉ. श्याम बिहारी लाल यांना अचानकपणे हृदयविकाराचा झटका आल्याची धक्कादायक घटना घडली. त्यांना तातडीने उपचारासाठी मेडिसिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरु असतानाच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेनं बरेलीच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : 'पनवेलमध्ये पैशांच्या जोरावर निवडणूक जिंकली', शेकाप माजी आमदार बाळाराम पाटील संतापले
योगी आदित्यनाथ यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. श्याम बिहारी लाल यांचा मृत्यूच्या एक दिवस आधी वाढदिवस होता. एका सभेदरम्यान, त्यांना अचानकपणे हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचे निधन झाले. तसेच ते दोन वेळा फरीदपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले होते. या निधनानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री .योगी आदित्यनाथ यांनी 'x' वर ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
डॉ. श्याम बिहारी लाल यांच्या मृत्यूनंतर योगी आदित्यनाथ यांनी भाजप आमदाराच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला होता. तसेच सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये योगी आदित्यनाथ यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं की, 'बरेली जिल्ह्यातील फरीदापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. श्याम बिहारीलाल यांचे निधन झाले. ही दु:खद घटना असून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. शोकाकुल झालेल्या कुटुंबासोबत माझ्या संवेदना'. अशी योगी आदित्यनाथ यांनी भावूक पोस्ट शेअर केली.
हे ही वाचा : काका, भाऊ आणि वडील ग्राहकांना घरी बोलावतात नंतर आमच्यासोबतच... 'या' समाजात लेकींना ढकललं जातं वेश्याव्यवसायात
दरम्यान, 2022 मध्ये भाजपचे उमेदवार डॉ. श्याम बिहारी लाल यांनी फरीदपूर मतदारसंघातून विजय मिळवला होता. तसेच त्यांनी यापू्र्वी 2017 मध्ये विधानसभा निवडणुकीत समाजवादी पक्षाचे डॉ. सियाराम सागर यांचा पराभव केला होता.
ADVERTISEMENT











