Thane : ठाकरे विरुद्ध शिंदे गटात जोरदार राडा; ऐन होळीच्या दिवशी शिवसैनिकांचा शिमगा

मुंबई तक

06 Mar 2023 (अपडेटेड: 26 Mar 2023, 04:56 PM)

Thackeray Vs Shinde : ठाणे : येथील शिवाईनगर परिसरात ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध शिंदे गटाच्या (Shinde Group) कार्यकर्त्यांमध्ये आज (सोमवार) रात्री आठ वाजता जोरदार राडा झाला. शिवाई नगरची शाखा ताब्यात घेण्याच्या कारणावरुन हा राडा झाल्याचं बोललं जात आहे. यावेळी शिवसेना (Shivsena) प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी कुलुप तोडून शिवाई नगरची […]

Mumbaitak
follow google news

Thackeray Vs Shinde :

हे वाचलं का?

ठाणे : येथील शिवाईनगर परिसरात ठाकरे (Uddhav Thackeray) विरुद्ध शिंदे गटाच्या (Shinde Group) कार्यकर्त्यांमध्ये आज (सोमवार) रात्री आठ वाजता जोरदार राडा झाला. शिवाई नगरची शाखा ताब्यात घेण्याच्या कारणावरुन हा राडा झाल्याचं बोललं जात आहे. यावेळी शिवसेना (Shivsena) प्रवक्ते आणि ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी कुलुप तोडून शिवाई नगरची शाखा ताब्यात घेतल्याचा आरोप होतं आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांची मोठी कुमक तैनात करण्यात आली आहे. (Thackeray vs Shinde group has a strong fight in thane)

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, रात्री आठ वाजता शिवाई नगर शाखेजवळ नरेश म्हस्केंच्या नेतृत्वात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी म्हस्केंसह नजीकच असलेल्या शिवाईनगर शाखेचं कुलुप तोडून सगळे जण आत गेले आणि आत मुक्काम ठोकला. ही बातमी कळताच संतप्त झालेले ठाकरे गटाचे शेकडो कार्यकर्ते शिवाई नगर शाखेबाहेर जमा झाले. याचवेळी ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते आमने सामने आले.

Exclusive: संजय राऊतांच्या बोलण्यात का वाढलीय शिवीगाळ?, राऊत म्हणाले..

दरम्यान, यानंतर सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली करून मिंथे गटाकडून आज शिवाई नगर येथील जुन्या शिवसेना शाखेचा कब्जा घेण्याचा डाव होत आहे, असा आरोप ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी माध्यमांशी बोलताना केला. तर ठाण्याचे जिल्हाप्रमुख केदार दिघे यांनी अशा पद्धतीचा वाद सणादिवशी घालणं आणि दावा करणं हे अत्यंत चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलं.

Meghalaya : ‘मविआ’ पार्ट – २ सपशेल फसला; सर्वात मोठ्या पक्षासोबत काय घडलं?

दरम्यान, या वादावर बोलताना नरेश म्हस्के म्हणाले, शिवाईनगर शाखा तिथले स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात कित्येक वर्षांपासून काम करत आहे. आता ही मंडळी आडकाठी आणण्याचं काम करत आहेत. पण या शाखेवर ताबा सरनाईक यांचा आणि त्यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांकडे असला पाहिजे. मी स्वतः आता स्थानिक पदाधिकाऱ्यांसह शाखेमध्ये बसलो आहे. जर त्यांना गरज असेल तर दुसरं कार्यालय थाटावं, असंही ते म्हणाले.

    follow whatsapp