‘माझं काय चुकलं?’; बंडखोर आमदार सुहास कांदेंची आदित्य ठाकरेंवर प्रश्नांची सरबत्ती

मुंबई तक

• 06:07 AM • 22 Jul 2022

-प्रवीण ठाकरे, नाशिक युवा सेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा आज नाशिक जिल्ह्यातून पुढे जाणार आहे. आदित्य ठाकरे हे मनमाड येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार असून, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. २१ जून रोजी शिवसेनेत बंडखोरी झाली. तेव्हापासून शिवसेनेत दोन गट […]

Mumbaitak
follow google news

-प्रवीण ठाकरे, नाशिक

हे वाचलं का?

युवा सेना प्रमुख आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची शिव संवाद यात्रा आज नाशिक जिल्ह्यातून पुढे जाणार आहे. आदित्य ठाकरे हे मनमाड येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार असून, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

२१ जून रोजी शिवसेनेत बंडखोरी झाली. तेव्हापासून शिवसेनेत दोन गट निर्माण झाले असून, बंडखोर आमदार सातत्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना प्रश्न विचारताना दिसत आहे. आदित्य ठाकरेंची शिव संवाद यात्रेनिमित्ताने मनमाडमध्ये येणार असल्याने नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी काही प्रश्न आदित्य ठाकरेंना विचारले आहेत.

आमदार सुहास कांदे हे आदित्य ठाकरे यांची सपत्नीक भेट घेणार आहे, मात्र दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्यानं पोलिसांकडून सुहास कांदे यांना आदित्य ठाकरेंना भेटण्याची परवानगी नाकारली जाऊ शकते, असं सुत्रांनी सांगितलं.

सुहास कांदेंनी आदित्य ठाकरेंना काय केले सवाल?

आदित्य ठाकरे यांच्या कार्यक्रमाच्या स्थळापासून काही अंतरावर दुसऱ्या ठिकाणी सुहास कांदे मेळावा घेणार आहे. हे शक्ती प्रदर्शन आहे का? यावर शेवाळे म्हणाले, “शक्ती प्रदर्शन म्हणता येणार नाही. बाळासाहेबांचे वंशज आदित्य ठाकरे यांना आम्हाला हिंदुत्वासंदर्भातील काही छोटे प्रश्न विचारायचे आहेत. मतदारसंघातील विकासासंदर्भातील प्रश्न आहेत.”

“आमच्यावर अन्याय का केला? ज्यांनी बॉम्बस्फोट घडवला. त्याला शिक्षा झाली. त्याला फाशीची शिक्षा होऊ नये, म्हणून ज्यांनी सह्या केल्या, त्यात नवाब मलिक आणि अस्लम शेख होते. त्यांच्या मांडीला मांडी लावून आम्हाला बसवलं. पालघरमध्ये साधूंना मारलं. त्यातील आरोपींचा जामीन केला. त्या राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसायचं का?,” असं सुहास कांदे यांनी म्हटलं आहे.

सुहास कांदेंनी राष्ट्रवादीवर काय केला आरोप?

“रेल्वेत बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले. ते दाऊदने घडवले. त्यात आता नवाब मलिक आणि दाऊदचे संबंध समोर आलेत. त्या मलिकांच्या मांडीला मांडी लावून आम्ही बसायचं का? बाळासाहेबांना टी बाळू म्हटलं गेलं. ज्यांना तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न झाला, त्यांच्या शेजारी आम्ही बसायचं का ज्या राष्ट्रवादीने शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला त्या राष्ट्रवादीसोबत आम्ही बसायचं का?,” असंही आमदार सुहास कांदे म्हणाले.

“नांदगाव विधानसभा मतदारसंघात मी पर्यटन विभागातंर्गत छत्रपती शिवाजी महाराजाचा पुतळा उभारण्याची मागणी केली, तो दिला नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा आणि स्मारकाची मागणी केली. तेही दिलं नाही. असे वेगवेगळे प्रश्न आहेत. मी सपत्नीक आदित्य ठाकरेंची भेट घेणार आहे,” असं सुहास कांदे यांनी सांगितलं.

    follow whatsapp