Sushma Andhare यांच्या विभक्त पतीचा ‘शिंदे गटात’ प्रवेश : 4 दिवसात करणार मोठा गौप्यस्फोट

मुंबई तक

• 08:37 AM • 13 Nov 2022

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आक्रमक उपनेत्या सुषमा अंधारे यांना शह देण्यासाठी शिंदे गटाने मोठी खेळी केली आहे. अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद मठ इथे शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे येत्या काळात शिंदे गट विरुद्ध सुषमा अंधारे यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. या […]

Mumbaitak
follow google news

ठाणे : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आक्रमक उपनेत्या सुषमा अंधारे यांना शह देण्यासाठी शिंदे गटाने मोठी खेळी केली आहे. अंधारे यांच्यापासून विभक्त झालेले त्यांचे पती वैजनाथ वाघमारे अडसरकर यांनी आज ठाण्यातील टेंभी नाका येथील आनंद मठ इथे शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे येत्या काळात शिंदे गट विरुद्ध सुषमा अंधारे यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हे वाचलं का?

या पक्षप्रवेशापूर्वी ‘मुंबई तक’शी बोलताना वैजनाथ वाघमारे म्हणाले, येत्या काही दिवसात सुषमा अंधारे काय होत्या, हे जळगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहे. तसंच आपण एकनाथ शिंदे यांच्या कामामुळे त्यांच्या प्रेमात पडलो आहे, त्यामुळे मी शिंदे गटात प्रवेश करत असल्याचं देखील वाघमारे यांनी स्पष्ट केलं. पक्ष जी जबाबदारी देईल ती मी चांगल्याप्रकारे पार पाडेल, असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

यावेळी त्यांनी सुषमा अंधारे यांच्यासोबतच्या नात्यावरही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही विभक्त झालेलो आहोत. आमचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. त्यांचा विचार त्यांच्यासोबत आहे, माझा विचार माझ्यासोबत आहेत. त्या कुठे आहेत, ठाकरे गटात आहेत की आणखी कुठे याबाबत आपल्याला कल्पना नाही, असंही ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर सुषमा अंधारे यांनी राष्ट्रवादीमधून शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला. मला पक्षाकडून काहीच नको, असं म्हणतं फक्त उद्धव ठाकरे यांच्या स्वभावामुळे मी प्रवेश केला असल्याचं त्या म्हणाल्या होत्या. मात्र त्यानंतर त्या आपल्या आक्रमक भाषणाच्या माध्यामातून एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांवर जोरदार टीका करु लागल्या. त्यांच्या सभांना आणि भाषणांनाही प्रतिसाद मिळू लागल्याचं चित्र दिसून आलं.

नुकतंच सुषमा अंधारे जळगाव दौऱ्यावर गेल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी त्यांचे चांगलेच खटके उडाले होते. सुषमा अंधारे या तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेलं बाळ आहे, असं पाटील म्हणाले होते. तर अंधारे यांना भाषण न करु दिल्याच्या मुद्द्यावरुनही चांगलचं वातावरण तापलं होतं. अंधारे यांनीही गुलाबराव पाटील यांना जोरदार प्रत्यूत्तर दिलं होतं.

    follow whatsapp