Swiggy बॉयचा मुंबईतल्या पावसात घोड्यावर बसून प्रवास, स्विगीने केलं महत्त्वाचं आवाहन

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पाऊस पडतो आहे. अशात एका स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. कारण हा डिलिव्हरी बॉय ऑर्डर देण्यासाठी थेट घोड्यावर बसून गेला आहे. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे. ५ जुलै रोजी स्विगीने घोड्यावरून डिलिव्हरी करणारा हा डिलिव्हरी बॉय कोण आहे त्याला ओळखण्यासाठी स्विगीने आवाहन केलं आहे. या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:45 PM • 06 Jul 2022

follow google news

मुंबईत गेल्या काही दिवसांपासून चांगलाच पाऊस पडतो आहे. अशात एका स्विगीच्या डिलिव्हरी बॉयचा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होतो आहे. कारण हा डिलिव्हरी बॉय ऑर्डर देण्यासाठी थेट घोड्यावर बसून गेला आहे. अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला आहे.

हे वाचलं का?

५ जुलै रोजी स्विगीने घोड्यावरून डिलिव्हरी करणारा हा डिलिव्हरी बॉय कोण आहे त्याला ओळखण्यासाठी स्विगीने आवाहन केलं आहे. या अज्ञात डिलिव्हरी बॉयला शोधण्यासाठी मदत करण्याचं आवाहन केलं आहे. हा शूर तरूण स्टार कोण आहे? असं विचारण्यात आलं आहे. त्यावर स्विगीची खिल्लीही उवडली जाते आहे.

स्विगीने त्यांच्या निवेदनात काय म्हटलं आहे?

तो तुफान चालवत आहे की बिजली? त्याच्या पाठिला बांधलेल्या बॅगेत काय आहे? पावसाळ्याच्या दिवसात मुंबईचा गजबजलेला रस्ता ओलांडण्याचा तो एवढा निर्धार का करतो आहे? जेव्हा तो ऑर्डर डिलिव्हरी करायला गेला होता तेव्हा त्याने घोडा कुठे पार्क केला असेल? असे प्रश्न विचारले गेले आहेत. स्विगी वाइड हॉर्स हंट लाँच करण्यात आलं आहे. जो कुणही या बाबत माहिती देऊ शकेल त्याला स्विगी मनीमध्ये ५ हजार मिळतील अशीही घोषणा करण्यात आली.

मुंबईत भर पावसात घोड्यावरून डिलिव्हरी देण्यासाठी चाललेल्या तरुणाचा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलचा व्हायरल होत आहे. या व्हिडिओत घोड्यावर बसलेला एक तरुण दिसतो. त्याच्या पाठीवर स्विगीची बॅग अडकवलेली दिसते. आपल्या कस्टमरला डिलिव्हरी देण्यासाठी तो चालला असल्याचं या फोटोत दिसतं. मुंबईत कुणीतरी हा फोटो क्लिक करून सोशल मीडियावर व्हायरल केला आणि त्याची सगळीकडे एकच चर्चा सुरू झाली.

स्विगी कंपनीकडून याची दखल घेण्यात आली असून तरुणाने दाखवलेल्या या धैर्याचं कौतुक केलं आहे. कस्टमरपर्यंत पोहोचण्यासाठी शक्य त्या सर्व साधनांचा वापर करणाऱ्या तरुण पार्टनरचा आपल्याला अभिमान असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. मात्र हे थोर कार्य करणाऱ्या तरुणाबाबत कंपनीकडे कुठलीही ठोस मा्हिती नसल्यामुळे त्या तरुणाचं कौतुक करणं शक्य होत नाहीए. त्यासाठीच कंपनीनं एक ऑफर दिली आहे. Let’s address the horse in the room असं कॅप्शन देत स्विगीने हे निवेदन ट्विट केलं आहे.

    follow whatsapp