दसरा मेळाव्याची स्क्रिप्ट मातोश्रीवरूनच येते, आम्हाला त्यात पडायचं नाही- जयंत पाटील

मुंबई तक

• 06:24 AM • 20 Sep 2022

दसरा मेळाव्याची स्क्रिप्ट बारामतीहून येते असं ट्विट मनसेचे नेते गजानन काळे यांनी केलं होतं त्यावर जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. दसरा मेळाव्याची स्क्रिप्ट ही मातोश्रीवरूनच येते त्या फंदात बारामती किंवा राष्ट्रवादी पडत आणि त्यांचे विचार असतात ते तिथे मांडतात, हे महाराष्ट्राला नव्हे तर उभ्या जगाला माहित आहे असं जयंत पाटील म्हणाले आहेत. महाराष्ट्राचा कौल […]

Mumbaitak
follow google news

दसरा मेळाव्याची स्क्रिप्ट बारामतीहून येते असं ट्विट मनसेचे नेते गजानन काळे यांनी केलं होतं त्यावर जयंत पाटील यांनी उत्तर दिले आहे. दसरा मेळाव्याची स्क्रिप्ट ही मातोश्रीवरूनच येते त्या फंदात बारामती किंवा राष्ट्रवादी पडत आणि त्यांचे विचार असतात ते तिथे मांडतात, हे महाराष्ट्राला नव्हे तर उभ्या जगाला माहित आहे असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

हे वाचलं का?

महाराष्ट्राचा कौल महाविकास आघाडीला- जयंत पाटील

ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी दोन नंबरवर राहिली, बाळासाहेबांच्या शिवसेनेला संपवण्याचा घाट राष्ट्रवादीने घातला असं वक्तव्य आशिष शेलार यांनी केलं यावर जयंत पाटील यांनी उत्तर दिलं आहे. बाळासाहेबांची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मिळून भाजप आणि शिंदे गटापेक्ष्या कितीतरी जागा जास्त आलेल्या आहेत.  जवळपास २५८ पर्यंत आमच्या ग्रामपंचायती आल्या आहेत  भाजप आणि शिंदे गट मिळून २०० जवळ त्यांचा आकडा आहे त्यामुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, महाविकास आघाडीला महाराष्ट्राचा पाठिंबा आहे.

गजानन काळेंनी काय ट्विट केलं?

गजानन काळे हे मनसेचे नेते तसेच प्रवक्ते देखील आहेत. त्यांना नेहमीच आपल्या परखड वक्तव्यांसाठी ओळखले जाते. ”दसऱ्या मेळाव्यावरुन गजानन काळेंनी शिवसेनेवरती टीका केली आहे. ”मुंबई मनपा व राज्यसरकारने शिल्लक सेनेला शिवतीर्थावर “टोमणे मेळावा”साठी परवानगी देवून टाकावी. आणि खंजीर, मर्द, मावळा, वाघनखं, गद्दार, निष्ठा यातून होणाऱ्या मनोरंजनापासून महाराष्ट्राला वंचित ठेवू नये. तसेही यावेळची स्क्रिप्ट बारामतीवरून येणार आहे. अबू आझमी व ओवेसी स्टेजवर असणार आहेत का?” असं ट्विट गजानन काळे यांनी केलं आहे.

दसरा मेळाव्यावरुन अजूनही संभ्रम

दसरा मेळाव्यावरुन अजूनही एकनाथ शिंदे गट आणि शिवसेना यांच्या संभ्रम आहे. कारण दोन्ही गट दसरा मेळावा घेण्यावर ठाम आहेत. एकनाथ शिंदे गटाला बीकेसीतील मैदान मिळालेले आहे. परंतु त्यांनी शिवाजी पार्क मैदानासाठी देखील अर्ज केलेला आहे. तसाच अर्ज उद्धव ठाकरेंनी देखील केलेला आहे. त्यामुळे अजूनही दसरा मेळावा कोण घेणार आणि कुठे होणार याबाबत संभ्रम आहे.

    follow whatsapp