Maharashtra Congress: ”प्रियंका गांधींना दिलेली वागणूक अपमानास्पद, काँग्रेस लढत राहील”

मुंबई तक

• 11:17 AM • 05 Aug 2022

मुंबई: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याशी पोलीस दलाकडून ज्याप्रकारे गैरवर्तन करण्यात आले ते अपमानास्पद आहे. ही सर्व विरोधी पक्षाचे अस्तित्व संपवण्याची मानसिकता दर्शवत आहे, असे मत महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केलं आहे. ”केंद्र सरकारच्या जाचक कारभाराविरोधात काँग्रेस लढत राहील” नाना पटोले म्हणाले, “विरोधकांनाही मान द्यायला हवा. मात्र त्यांना विरोधी पक्ष […]

Mumbaitak
follow google news

मुंबई: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्याशी पोलीस दलाकडून ज्याप्रकारे गैरवर्तन करण्यात आले ते अपमानास्पद आहे. ही सर्व विरोधी पक्षाचे अस्तित्व संपवण्याची मानसिकता दर्शवत आहे, असे मत महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केलं आहे.

हे वाचलं का?

”केंद्र सरकारच्या जाचक कारभाराविरोधात काँग्रेस लढत राहील”

नाना पटोले म्हणाले, “विरोधकांनाही मान द्यायला हवा. मात्र त्यांना विरोधी पक्ष नको आहे ते विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी यांना राष्टपतींच्या भेटू दिले नाही. महागाई आणि बेरोजगारीच्या प्रश्नावर खासदाराला राष्ट्रपतींना भेटायचे असेल तर तो गुन्हा आहे का? पण राहुल गांधी आणि प्रियांका गांधी या दोघांनाही थांबवण्यात आलं आणि त्यांना कशी वागणूक दिली गेली हे संपूर्ण देशाने पाहिलं. मात्र केंद्र सरकारच्या जाचक कारभाराविरोधात काँग्रेस लढत राहील.”

हे एक वैध सरकार आहे का?- पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) म्हणाले की, सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा होत नाही. “आमचे अर्थमंत्री प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाहीत. सरकार अनभिज्ञ आहे. शेजारील देशांचे उदाहरण आपल्याकडे आहे आणि जे घडले तेच येथेही होऊ शकते. पण नरेंद्र मोदी सरकार अर्थव्यवस्था वाचवण्याबाबत अनभिज्ञ आहे.” असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले आहेत.

महाराष्ट्र काँग्रेसनेही राज्य सरकारवर निशाणा साधला असून एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) केवळ केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन करत असल्याचं ते म्हटले आहेत. “हे एक वैध सरकार आहे का? ते सरकारमधील पोर्टफोलिओ आहेत. एका महिन्याहून अधिक काळ लोटला असून मंत्रिमंडळ नाही. किमान 12 मंत्री असायला हवे होते पण नियम पाळले जात नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने या बाबीकडेही लक्ष द्यावे.” असे अशोक चव्हाण म्हणाले.

मुख्यमंत्र्यांना स्वत:च्या सोयीची काळजी- नाना पटोले

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वर्षा या अधिकृत बंगल्यात जाण्याचा विचार करत आहेत, असे विचारले असता नाना पटोले यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. “त्यांना फक्त त्यांच्या स्वतःच्या सोयीची काळजी आहे आणि गरिबांच्या गरजांची पर्वा नाही.” असे पटोले म्हणाले.

सोनिया गांधी-राहुल गांधींना घेतलं ताब्यात

काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांनाही दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधाता काँग्रेसने आंदोलन केलं. देशव्यापी आंदोलन करण्यास सुरूवात झाली आहे. देशभरात महागाई आणि बेरोजगारीच्या मुद्द्यावर आंदोलन सुरू आहे. अशात आता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या दोघांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

    follow whatsapp