नागपूरमध्ये आज एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस नाकाबंदीदरम्यान एका कारचालकाने वाहतूक पोलिसाला आपल्या कारच्या बोनेटवर बसवत काही अंतरावर नेलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या पंचशील चौकात वाहतूक शाखेचा एक पोलीस कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत होता. यावेळी नाकाबंदीमध्ये या पोलीस कर्मचाऱ्याने एका स्कोडा गाडीला थांबण्याची विनंती केली. परंतू कारचालकाने गाडी न थांबवता थेट पोलिसांच्या अंगावर गाडी घातली.
ट्रॅफीक पोलिसाने प्रसंगावधान राखत कारच्या बोनेटवर उडी मारल्यामुळे अनर्थ ठरला. परंतू अशा प्रसंगातही हा कारचालक पोलिसाला घेऊन काही अंतरावर गेला.
यावेळी रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या आजुबाजूच्या लोकांनी या कारच्या पुढे आपल्या गाड्या थांबवत पोलीस कर्मचाऱ्याला खाली उतरवलं. वाहतूक पोलीस शाखेचे सहायक पोलीस आयुक्त अजयकुमार मालविय यांनी दिलेल्या माहितीनुसार या गाडीत पती-पत्नी प्रवास करत होते. यातील कारचालकाला मधुमेहाचा त्रास असल्याचं पोलिसांनी सांगितलं. पोलिसांनी या जोडप्यावर वाहतुकीचे नियम मोडल्यासंबंधी चलन फाडून त्याला सोडून दिलं आहे.
सोलापूर : जनावरांच्या हाडांपासून भुकटी आणि डाळडा बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई
ADVERTISEMENT
