नागपुरात भीषण अपघात, बाइकवरील तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई तक

• 06:14 AM • 18 Apr 2022

योगेश पांडे, नागपूर: वेगात जाणाऱ्या टॅक्सी कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर स्वार पती-पत्नी व भाच्याचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील जुनोना फुके शिवारात घडली आहे. काल (17 एप्रिल) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ज्यामध्ये एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाला. एक लग्न आटोपून रामचंद्र नेहारे, […]

Mumbaitak
follow google news

योगेश पांडे, नागपूर: वेगात जाणाऱ्या टॅक्सी कारने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने दुचाकीवर स्वार पती-पत्नी व भाच्याचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील जुनोना फुके शिवारात घडली आहे.

हे वाचलं का?

काल (17 एप्रिल) सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. ज्यामध्ये एकाच वेळी तिघांचा मृत्यू झाला. एक लग्न आटोपून रामचंद्र नेहारे, रंजना नेहरे व त्यांचा भाचा रोशन मुंगभाते हे गावाकडे परत येत असताना प्रवासी घेऊन जाणाऱ्या बोलेरो कारने त्यांच्या बाइकला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, ज्यामध्ये बाइकचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. तर बाइकवरील तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

दुसरीकडे अपघातग्रस्त कारही नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या बाजूला फेकली गेली. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी तीनही जणांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले असून ते शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. तसंच कार चालकाविरुद्ध गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

पालीमध्ये भीषण बाइक अपघातात दोन तरुणांचा मृत्यू

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पालीमध्ये भीषण बाइक अपघातात दोन जणांना आपला जीव गमवावा लागला होता. नांदगाव पाली रोडवर शर्मा फार्म हाऊसच्या समोर हा भीषण अपघात झाला होता. रमेश शांताराम पवार (वय 24 वर्ष) हा डिस्कव्हर मोटारसायकल क्रमांक एम एच 06 बी एच 6455 चालवत होता. तर त्याच वेळी त्याचवेळी त्याच्यासोबत मागील सीटवर संतोष पवार हा तरुण देखील होता.

पाली रोडवर नांदगाव गावच्या हद्दीत शर्मा फार्म हाऊससमोर अचानक रस्त्यात काही म्हशी आडव्या आल्या. त्यामुळे तुफान वेगात असणाऱ्या रमेशला आपली दुचाकी नियंत्रित करता आली नाही अन् त्याने समोरच्या म्हशींना धडक दिली. ही धडक एवढी जोरदार होती की, त्यात रमेशचा जागीच मृत्यू झाला होता.

या घटनेत रमेश शांताराम पवार याला गंभीर दुखापत झाली होती. त्याच्या नाका तोंडातून व डोक्यातून प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. तर गंभीर जखमी असलेल्या संतोष पवार याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग येथून मुंबईला नेत असताना त्याचा देखील रस्त्यातच मृत्यू झाला होता.

आंबा घाटात भीषण अपघात; ४०० फूट खोल दरीत कोसळली गाडी

या घटनेची पाली पोलीस स्थानकात मोटार अपघात 04/2022 प्रमाणे नोंद करण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास पाली पोलीस निरीक्षक विश्वजित काईनगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो नाईक एस एन फडताडे करीत होते.

    follow whatsapp