What’s App, Instagram आणि फेसबुक डाऊन; ‘ट्विटर’वर खिल्ली उडवणाऱ्या ‘मीम्स’चा पूर

मुंबई तक

• 02:02 AM • 05 Oct 2021

What’s App, इंस्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडिया साईट जगभरात अनेक ठिकाणी ठप्प झाल्या आहेत. यामुळे तमाम युझर्सना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. फेसबुकने आपल्या वेबसाईटवर मेसेज लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘माफ करा, काहीतरी चुकीचं झालं आहे, गुंता सोडवण्याचा, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत लवकरच सगळं सुरळीत होईल.’ असं फेसबुकने त्यांच्या संदेशात लिहिलं आहे. Whats […]

Mumbaitak
follow google news

What’s App, इंस्टाग्राम, फेसबुक या सोशल मीडिया साईट जगभरात अनेक ठिकाणी ठप्प झाल्या आहेत. यामुळे तमाम युझर्सना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. फेसबुकने आपल्या वेबसाईटवर मेसेज लिहून दिलगिरी व्यक्त केली आहे. ‘माफ करा, काहीतरी चुकीचं झालं आहे, गुंता सोडवण्याचा, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत लवकरच सगळं सुरळीत होईल.’ असं फेसबुकने त्यांच्या संदेशात लिहिलं आहे.

हे वाचलं का?

Whats App चा प्रॉब्लेम काय ?

Whats App साईन होत नाहीये. लॅपटॉपवरही व्हॉट्स अप साईन इन होत नाही. तसंच मेसेजेस जात, येत नाहीत. मागील पंचवीस मिनिटांपासून ही समस्या जाणवते आहे. अशात व्हॉट्स अपवर ही प्रकिया सुरू होत नाहीये. त्यामुळे अनेक युझर्स चिडले आहेत. व्हॉट्स अपने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. यामध्ये त्यांनी आम्हाला या समस्येविषयी माहिती असून आम्ही त्यावर काम करत आहोत आणि लवकरच व्हॉट्स अप पूर्ववत होईल असं म्हटलं आहे.

फेसबुकनेही व्यक्त केली दिलगिरी

फेसबुकही लॉग ईन होत नाहीये. त्यामुळे त्यांनी त्यांच्या साईटवर दिलगिरी व्यक्त केली आहे. त्यांनीही असं म्हटलं आहे की लवकरच फेसबुक पूर्ववत होईल. आम्हाला समस्या समजली आहे आणि आम्ही ती सोडवण्यासाठी प्रयत्न करतो आहोत असंही फेसबुकने म्हटलं आहे.

ट्विटरवर सुरू झाले मीम्स

Whats App फेसबुक आणि इंस्टाग्राम डाऊन झाल्याने आता ट्विटरवर मीम्स सुरू झाले आहेत. ट्विटरवर फेसबुक, इंस्टाग्राम आणि Whats App डाऊन झाल्याने मीम्स सुरू झाले आहेत. ज्याद्वारे ट्विटरवरून या तिन्ही अॅपची खिल्ली उडवली जाते आहे.

ट्विटरवर हे तिन्ही अॅप डाऊन झाल्यानंतर या तिन्ही अॅपची खिल्ली उडवली जाते आहे.

    follow whatsapp