पदार्पणात फिल्मफेअर ते ड्रग्ज प्रकरण : असा आहे अनन्या पांडेचा आतापर्यंतचा प्रवास

22 वर्षीय अनन्या पांडे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. तिने आपले शालेय शिक्षण धीरूभाई इंटरनॅशनल अंबानी स्कूलमधून पूर्ण केले आहे. अनन्याने एका मोठ्या बॅनरच्या सिनेमासह बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून दिग्दर्शक करण जोहरने तिला पहिला ब्रेक दिला होता. या चित्रपटात टायगर श्रॉफ हा हिरो होता. हा सिनेमा […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:00 AM • 30 Oct 2021

follow google news

हे वाचलं का?

22 वर्षीय अनन्या पांडे बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची मुलगी आहे. तिने आपले शालेय शिक्षण धीरूभाई इंटरनॅशनल अंबानी स्कूलमधून पूर्ण केले आहे.

अनन्याने एका मोठ्या बॅनरच्या सिनेमासह बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. ‘स्टुडंट ऑफ द इयर 2’ या चित्रपटातून दिग्दर्शक करण जोहरने तिला पहिला ब्रेक दिला होता. या चित्रपटात टायगर श्रॉफ हा हिरो होता.

हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर फारसा काही चालला नाही. पण अनन्या लोकांचा पसंतीस उतरली होती. यासाठी अनन्याला सर्वोत्कृष्ट महिला पदार्पण फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे.

अनन्या 2019 साली पती पत्नी और वो या चित्रपटात दिसली होती. यानंतर, 2020 मध्ये तिने ‘खाली पीली’ या चित्रपटात काम केले. अल्पावधीतच अनन्या पांडे ही इंडस्ट्रीमधील एक प्रसिद्ध चेहरा बनली.

अनन्याकडे अनेक मोठ्या कंपन्यांच्या जाहिरातीही आहेत. आगामी प्रोजेक्टचा विचार केल्यास तिचा पुढील सिनेमा हा शकुन बत्रासोबत आहे. यामध्ये दीपिका पदुकोण आणि सिद्धांत चतुर्वेदी देखील दिसणार आहेत.

लाइगर हा चित्रपटही अनन्याने साइन केला आहे. या चित्रपटात ती विजय देवरकोंडासोबत दिसणार आहे.

अनन्याच्या लव्ह लाईफबद्दल मागे बरीच चर्चा होती. यावेळी तिचे नाव शाहिद कपूरचा भाऊ ईशान खट्टरशी जोडले गेले आहे.

अनन्या ईशानसोबत अनेक वेळा स्पॉट झाली आहे. दोघांच्या रोमान्सच्या चर्चा वारंवार होतात. पण अनन्याने तिच्या नात्याबाबत आजपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

अनन्या पांडेच्या मित्रांचा विचार केल्यास शाहरुख खानची मुलगी सुहाना आणि संजय कपूरची मुलगी शनाया कपूर या तिच्या ‘बेस्ट फ्रेंड’ आहेत. त्या दोघींहीसोबत ती अनेकदा परदेशी फिरण्यााठी देखील जाते.

अनन्या पांडे आणि वाद हे समीकरण काही नवं नाही. अनन्यासोबत शिकणाऱ्या मुलीने तिच्या अभ्यासाबद्दल खुलासा केला होता. त्यात मुलीने असं म्हटलं होतं की, अनन्याचा कॉलेज प्रवेश हा बनावट असल्याचे सांगितले होते.

मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा अटकेत असतानाच अनन्या पांडे हीचं देखील नाव ड्रग्स कनेक्शनमध्ये समोर आलं आहे. तिचीही चौकशी करण्यात आली आहे.