Pune Suicide : कृष्णा पांचाळ - पुणे येथील तळेगाव दाभाडे येथे मन हेलावून टाकणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. कातवी येथील स्थित असलेल्या व्हिटीपी अर्बन लाईफ सोसायटीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारत एका महिलेनं जीवन संपवलं. या घटनेनं संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. आत्महत्या केलेल्या महिलेची ओळख प्रतिभा मनीष शंकर (वय 34) अशी पटली. आपल्या पती आणि तीन मुलांसह याच सोसायटीत राहत होती, अशी माहिती समोर आली.
ADVERTISEMENT
हे ही वाचा : Astrology : 11 मे पासून ग्रह स्थिती बदलणार, तर 'या' राशींना अडचण निर्माण होईल
बाल्कनीच्या कठाड्यावर चढून नवऱ्याने बायकोचा हात पकडला मात्र, प्रतिभाचा हात सुटला
घडलेल्या घटनेनुसार, शनिवारी दुपारी साधारण 1 वाजण्याच्या सुमारास, प्रतिभा शंकर अचानकपणे आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीत धावत गेली आणि तिने आपले जीवन संपवलं. बाल्कनीच्या कठाड्यावर चढून त्याने तिचा हात पकडला. पण काही सेकंदातच तिच्या पतीने तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, परंतु त्याची पकड कमकुवत झाली आणि प्रतिभाचा हात सुटला, नंतर ती आठव्या मजल्यावरून खाली कोसळली.
आठव्या मजल्यावरून महिला जमिनीवर कोसळल्याने दुर्दैवी अंत
ती जमिनीवर आदळल्याने सोसायटीत एकच गोंधळ उडाला. गंभीर अवस्थेत असताना तिला तातडीने, रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर तिला मृत घोषित केले. मृत महिलेच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. या दुर्दैवी घटनेनं कुटुंब शोकाकुल झाले.
हे ही वाचा : बेरोजगारीमुळे घडले हत्याकांड, 23 वर्षीय नातवाने 70 वर्षीय आजीचा चिरला गळा
मृत प्रतिभाच्या या टोकाच्या निर्णयाने हा कुटुंबाचा वाद असल्याची शक्यता वर्तवण्यात येते. या मृत्यूमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. तळेगाव MIDC पोलीस ठाण्यात घटनेप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिसांनी या प्रकरणाचा सर्व बाजूने तपास सुरुच ठेवला होता. या दुर्दैवी घटनेनंतर परिसर हादरून गेला आहे.
ADVERTISEMENT











