उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे की, देवेंद्र फडणवीस; श्रीमंतीत कोण कुणाला भारी?

महाराष्ट्राने मागच्या अडीच पावणे तीन वर्षाच्या काळात तीन मुख्यमंत्री बघितले. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर ७२ तासांसाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवत शिवसेनेनं सत्ता स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. अवघ्या अडीच पावणे तीन वर्षाच्या काळातच त्यांनाही मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. आता राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रं एकनाथ शिंदे यांनी घेतलीये. गेल्या […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 01:06 PM • 05 Jul 2022

follow google news

महाराष्ट्राने मागच्या अडीच पावणे तीन वर्षाच्या काळात तीन मुख्यमंत्री बघितले. विधानसभेचा निकाल लागल्यानंतर ७२ तासांसाठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत हातमिळवत शिवसेनेनं सत्ता स्थापन केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. अवघ्या अडीच पावणे तीन वर्षाच्या काळातच त्यांनाही मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं. आता राज्याच्या मुख्यमंत्री पदाची सुत्रं एकनाथ शिंदे यांनी घेतलीये.

हे वाचलं का?

गेल्या दहा बारा दिवसांत चांगलंच सत्तानाट्य रंगल्यानंतर महाराष्ट्राला नवे मुख्यमंत्री मिळाले. एकनाथ शिंदेंनी भाजपच्या सोबतीने सरकार स्थापन केलं आणि महाराष्ट्रातील सत्तानाट्याचा फक्त एक भाग संपलाय. या सर्व सत्तानाट्यात चर्चेच्या केंद्रस्थान होते, ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. पण, या तिन्ही नेत्यांकडे किती संपत्ती आहे? तिघांपैकी सर्वाधिक श्रीमंत कोण आहे? हेच या व्हिडीओतून जाणून घेऊयात.

    follow whatsapp