Baba Ramdev : “अमृता वहिनी शांत कशा बसल्या?; कानाखाली द्यायला पाहिजे होती” : संजय राऊत

योगगुरु रामदेवबाबांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात महिलांबाबत अक्षेपार्ह विधान केलं होतं. आता या विधानावरुन रामदेव बाबांवर चौफेर टीका होताना पाहायला मिळत आहे. खासदार संजय राऊत यांनी रामदेव बाबांनी केलेल्या विधानावरुन खरपूस समाचार घेतला. त्यांनी माध्यामांना आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महिलांबाबत असं लज्जास्पद वक्तव्य करणारा कितीही मोठा असला तरी त्याच्या सनसनीत कानाखाली तिथं बसायला हवी होती, […]

Mumbai Tak

मुंबई तक

26 Nov 2022 (अपडेटेड: 02 Mar 2023, 09:36 AM)

follow google news

योगगुरु रामदेवबाबांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात महिलांबाबत अक्षेपार्ह विधान केलं होतं. आता या विधानावरुन रामदेव बाबांवर चौफेर टीका होताना पाहायला मिळत आहे. खासदार संजय राऊत यांनी रामदेव बाबांनी केलेल्या विधानावरुन खरपूस समाचार घेतला. त्यांनी माध्यामांना आपली संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. महिलांबाबत असं लज्जास्पद वक्तव्य करणारा कितीही मोठा असला तरी त्याच्या सनसनीत कानाखाली तिथं बसायला हवी होती, असं संजय राऊत म्हणाले. संजय राऊत बुलडाना येथे माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

हे वाचलं का?

महिलांबाबत लज्जास्पद विधान होत असताना अमृता वहिनी शांत कशा बसल्या?

रामदेव बाबांनी लज्जास्पद विधान करत असताना उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस तिथे उपस्थित होत्या. अशाप्रकारच्या महिलांबाबत लज्जास्पद विधान होत असताना अमृता वहिनी शांत कशा बसल्या? असा सवाल यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला. कितीही मोठा असला तरी त्याच्या कानाखाली तिथे बसायला पाहिजे होती. एकाबाजुला तुम्ही महिलांच्या रक्षणाच्या गोष्टी करतात. कायदे बनवतात. ज्ञान पाजळता, आणि त्याचवेळेला असंख्य महिलांसमोर एक बाबा, एक महाराज भगव्या वस्त्रात महिलांचा असा अपमान करतो. तरी सरकार गप्प आहे, या सरकारची जीभ कुठे दिल्लीत गहाण ठेवली का? येवढच मला पहायचंय, अस संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्राचे राज्यपाल शिवरायांचा अपमान करतात. तरी देखील सरकार शांत बसलं. कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातून सोलापूर, सांगली खेचून घेण्याची भाषा केली तरी सरकार तोंड शिऊन गप्प आहे. आणि आता रामदेव बाबासारखे भाजपचे महाप्रचारक महिलांविषयी अभद्र उद्गार काढतात, तरी सरकार गप्प बसलंय, सरकारने जीभ दिल्लीत गहाण ठेवलीय का? हे मला पाहायचंय, असं संजय राऊत म्हणाले. एकूणच रामदेव बाबा महिलांविषयी केलेल्या वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहेत.

काय म्हटलं आहे रामदेवबाबांनी?

महिलांसाठी योगासनांचे ड्रेस आणण्यात आले आहे. पतंजली महिला संमेलनात अमृता फडणवीसही आल्या होत्या. यावेळी अमृता फडणवीस यांचं त्यांनी कौतुक केलं. अमृता फडणवीस या कायम प्रसन्न असतात. लहान मुलांप्रमाणे त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतं. असं हसू मला प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर पाहायचं आहे. यापुढे ते म्हणाले महिला साड्या नेसून चांगल्या दिसतात. त्या सलवार सूटमध्येही चांगल्या दिसतात आणि माझ्या नजरेने पाहिलं तर काही नाही घातलं तरीही चांगल्या दिसतात असं रामदेवबाबांनी म्हटलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका होत आहे.

    follow whatsapp