एका पाठोपाठ एक फ्लॉप.. बॉक्स ऑफिसवर धाडधाड का आपटतंय बॉलिवूड?

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड म्हणा किंवा हिंदी सिनेसृष्टीसाठी कठीण काळ सुरू आहे. कोव्हिडच्या दरम्यान लॉकडाऊन लागला. त्यामुळे सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं. थिएटर्स, मॉल्स बंद झाल्याने कमाई ठप्प झाली. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनेही सिनेसृष्टी हादरली. यानंतर देशातल्या अनेक स्टार्सना आपण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ऑफिसमध्ये ड्रग्ज प्रकरणात हजेरी लावलेलं पाहिलं. कोरोनाचा संसर्ग कमी झाला, तसंच लॉकडाऊनही संपला. […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 09:32 AM • 05 Aug 2022

follow google news

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड म्हणा किंवा हिंदी सिनेसृष्टीसाठी कठीण काळ सुरू आहे. कोव्हिडच्या दरम्यान लॉकडाऊन लागला. त्यामुळे सिनेसृष्टीचं मोठं नुकसान झालं. थिएटर्स, मॉल्स बंद झाल्याने कमाई ठप्प झाली. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनेही सिनेसृष्टी हादरली. यानंतर देशातल्या अनेक स्टार्सना आपण नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ऑफिसमध्ये ड्रग्ज प्रकरणात हजेरी लावलेलं पाहिलं.

हे वाचलं का?

कोरोनाचा संसर्ग कमी झाला, तसंच लॉकडाऊनही संपला. निर्बंध शिथील झाले, थिएटर्स सुरू झाले शूटिंग सुरू झालं. मत्र प्रेक्षक सिनेमागृहातून गायबच झाला. कारण लॉकडाऊनच्या दोन वर्षात त्याला ओटीटी प्लॅटफॉर्मची सवय लागली आणि ती सवय त्याची गरजही बनली. मागच्या सहा महिन्यांपासून बॉलिवूडला एका पाठोपाठ एक फ्लॉप सिनेमांनाच सामोरं जावं लागतं आहे. बॉलिवूडला सातत्याने आपटीबार का सहन का करावा लागतो आहे? हेच आपण जाणून घेणार आहोत. बॉलिवूडच्या दिग्गजांनी यावर मतं मांडली आहेत.

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श म्हणतात कोव्हिडमुळे बऱ्याच गोष्टी बदलल्या

तरण आदर्श म्हणतात कोव्हिडच्या तीन लाटांमध्ये दोन वर्षे गेली. त्यात ऑडियन्सची आवड प्रचंड बदलली. प्रेक्षकांना वर्ल्ड सिनेमाचं एक्स्पोजर मिळालं. त्यामुळे त्या सिनेमांची तुलना बॉलिवूडशी अगदी साहजिकपणे होऊ लागली. त्यामुळे लोकांनी हिंदी सिनेमांकडे पाठ फिरवली. लॉकडाऊनच्या नंतर काश्मीर फाईल्स, सूर्यवंशी, भुलभुलैय्या २, गंगुबाई काठियावाडी, आरआरआर, केजीएफ, पुष्पा सारख्या सिनेमांनी चांगला व्यवसाय केला. यावरून हे स्पष्ट झालं की लोकांना मनोरंजन हवं आहे मात्र त्याच्या नावे तुम्ही काहीही दाखवला तर ते सिनेमाकडे वळणार नाहीत.

मला तर असं वाटतं की आता मसाला सिनेमा तयार करणं जास्त कठीण झालं आहे. साऊथमधल्या सिनेमांची जादू बघा. तिथले डायरेक्टर ज्या पद्धतीने मसाला फिल्म्स आणत आहेत ते बॉलिवूडच्या फिल्ममध्ये नाही. राजामौलींची स्तुती हॉलिवूडपर्यंत झाली आहे. अशात आपल्याकडे आऊट ऑफ बॉक्स जाऊन कुणी विचार करतो का? हे पाहणं महत्त्वाचं आहे असं तरण आदर्श म्हणतात.

करीना कपूरने लालसिंग चढ्ढा सिनेमाच्या वादावर सोडलं मौन! म्हणाली, “अशा ट्रेंडकडे…”

OTT वर लवकर येऊ लागले आहेत चित्रपट असं आमिर खानचं म्हणणं आहे

याच संदर्भात आमिर खान सोबत आज तकने संवाद साधला तेव्हा त्याचं म्हणणं हे होतं की जर प्रेक्षकांना सिनेमा आवडला तर ते चित्रपटगृहांकडे वळतील. पुष्पा सिनेमाबाबत मी ऐकलं. हा सिनेमा एक कोटीच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनसह ओपन झाला होता. त्यानंतर सिनेमाच्या माऊथ पब्लिसिटीने कमाल केली असंही आमिरने म्हटलं आहे. कोव्हिडनंतर सिनेमा जरा लवकरच ओटीटीवर येऊ लागले आहेत. लोकांना हे वाटतं थिएटरला सिनेमा नाही पाहिला तरी ठीक आहे ओटीटीला येणारच आहे. थोडं थांबेन आणि घरीच सिनेमा पाहिन असा विचार लोक करू लागले आहेत.

अनीस बज्मी यांनी काय म्हटलं आहे या सगळ्या परिस्थितीबाबत?

अनीस बज्मी म्हणतात मला वाटतं की लोकांनी याबाबत एक व्यापक चर्चा केली पाहिजे. सिनेमा थिएटरमध्ये का चालत नाहीत याचं कारण तेव्हाच समोर येऊ शकतं. एवढंच नाही तर सिनेमाची गोष्ट काय? हा मुद्दाही महत्त्वाचा आहे. लोकांना गोष्ट आवडली नाही तर त्यावर विचार होण्याची गरज आहे.

काश्मीर फाईल्सचे दिग्दर्शक विवेक अग्नीहोत्री काय म्हणतात?

लोक ज्याला बॉलिवूड म्हणतात.. त्या बॉलिवूडला हे माहित नाही की ऑडियन्सला म्हणजेच प्रेक्षकांना काय हवं आहे? देशभक्तीपर सिनेमांच्या नावाखाली अनेकदा कसेही सिनेमा तयार केले जातात. कौटुंबिक सिनेमाच्या नावाखाली असं कुटुंब दाखवलं जातं जे कधी अस्तित्त्वात नसतं. सिनेमातले विद्यार्थी असे असतात ज्यांची तुलना कधीही रोजच्या जीवनात दिसणाऱ्या विद्यार्थ्यांशी होत नाही. कोरोना काळात लोकांनी मृत्यू अत्यंत जवळून पाहिला आहे. त्यामुळे आता लोक वास्तवाशी जोडले गेले आहेत. अशात त्यांना काय हवं आहे याचा विचार न करता सिनेमा तयार केला तर तो चालणं कठीण आहे.

धाकडचे प्रोड्युसर दीपक मुकुटे म्हणतात की आम्ही विशिष्ट योजना तयार करून सिनेमा बनवतो. मात्र लोकांना काय आवडेल ते काय पाहतील याची काहीही खात्री देता येत नाही. कोव्हिड काळानंतर लोकांची मानसिकता बदलली आहे. लोकांना वाटतं की चांगला कंटेट जर आपल्या ओटीटीवर मिळतोय तर मग हजारो रूपये खर्च करून थिएटरमध्ये का जायचं? धाकडसारखा महिला प्रधान अॅक्शनपट पडला कारण सिनेमा बघायला लोक आलेच नाहीत.

एकंदरीत सगळ्या दिग्गजांचं म्हणणं ऐकलं तर लक्षात येतं की लोकांना काय हवं आहे ते लक्षात घेऊन सिनेमा बनवला गेला पाहिजे. तसं झालं नाही तर सिनेमागृहाकडे वळणार नाहीत हे नक्की.

    follow whatsapp