पूजा अरुण राठोड नेमकी कोण? का केली जात आहे लपवाछपवी?

यवतमाळ: महाराष्ट्रात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्येनंतर पूजा अरुण राठोड नावाच्या एका 22 वर्षीय तरुणीचा यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. हा रिपोर्ट ‘मुंबई तक’च्या हाती लागला होता आणि या प्रकरणाने साऱ्या महाराष्ट्रत खळबळ उडवून दिली. याबाबत रुग्णालयाशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न वारंवार करण्यात आला पण कोणतीही माहिती मिळाली नाही. 7 फेब्रुवारी […]

Mumbai Tak

मुंबई तक

• 05:45 AM • 26 Feb 2021

follow google news

यवतमाळ: महाराष्ट्रात गाजत असलेल्या पूजा चव्हाण आत्महत्येनंतर पूजा अरुण राठोड नावाच्या एका 22 वर्षीय तरुणीचा यवतमाळच्या वसंतराव नाईक शासकीय रुग्णालयात गर्भपात करण्यात आला. हा रिपोर्ट ‘मुंबई तक’च्या हाती लागला होता आणि या प्रकरणाने साऱ्या महाराष्ट्रत खळबळ उडवून दिली. याबाबत रुग्णालयाशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न वारंवार करण्यात आला पण कोणतीही माहिती मिळाली नाही.

हे वाचलं का?

7 फेब्रुवारी रोजी पूजा चव्हाण या तरुणीने पुणे येथे आत्महत्त्या केली. या प्रकरणात भाजपाने यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड यांचे नाव घेतले. त्यात यवतमाळच्या रुग्णालयात पूजा अरुण राठोड नामक तरुणीचा गर्भपात झाल्याने या प्रकरणाचा थेट संबंध यवतमाळशी जोडला गेला. मात्र, या प्रकरणात प्रसूती विभागाचे डॉक्टर बोलण्यास तयार नाही.

मुंबई तकच्या टीमने प्रसूती विभाग प्रमुख डॉ रोहिदास चव्हाण यांच्याशी अनेक वेळा संपर्क साधला मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. एकंदरीत या प्रकरणाबाबत बोलण्यास कोणीही तयार नाही.

पूजा चव्हाणबाबतची ही बातमी पाहिली का?: पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी माझी व माझ्या समाजाची बदनामी-संजय राठोड

या संदर्भात डॉ मिलिंद कांबळे यांच्यासी संपर्क साधला तेव्हा ते असं म्हणाले की, ‘प्रसूतीबाबत आपल्याला त्याच डिपार्टमेंटचे लोकं सांगू शकतात. पण प्रसूतीसाठी आपण तसे काही कागदपत्रं घेत नाही. ते कुठल्या योजनेमध्ये असतील तर कागदपत्रं घेतले जातात.’

दरम्यान, पुणे पोलीस हे यवतमाळमध्ये येऊन चौकशी देखील करुन गेले पण यावेळी तपासात अगदीच ढिसाळपणा झाला असल्याचे आरोप भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी काल (26 फेब्रुवारी) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. त्यामुळे आता या संपूर्ण प्रकरणात पुणे पोलीस नेमकी काय माहिती देणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

एकीकडे या सगळ्या प्रकरणाबाबत पुणे पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं असताना शासकीय रुग्णालयातून देखील कोणत्या प्रकारची योग्य माहिती दिली जात नाहीए. एकूणच या साऱ्या प्रकरणात डॉक्टर देखील बोलायला तयार नसल्याने यवतमाळची पूजा अरुण राठोड कोण? हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

    follow whatsapp