केबिनमध्ये बोलवून विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे, नामांकित शाळेतील प्रकार; मुख्याध्यापकाला पालकांनी दिला चोप

Principal Misconduct with Students : शिक्षकावर विद्यार्थ्याचे चरित्र घडवण्याची जबाबदारी असते. मात्र जर शिक्षकच चरित्रहीन निघाला तर? तर काय होईल याचं प्रत्यक्ष उदाहरण असणारी एक खळबळजनक घटना समोर आलीये. एका नामांकित शाळेत ही घटना घडलीये. या शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या पदाचा गैरवापर करत 8 ते 10 वर्षांच्या विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुख्याध्यापकाची ही गैरवर्तणूक समोर येताच संतप्त पालक शाळेत पोहोचले आणि मुख्याध्यापकाला चोप दिला.

Principal Misconduct with Students

Principal Misconduct with Students

मुंबई तक

• 01:06 PM • 18 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

केबिनमध्ये बोलवून विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे, नामांकित शाळेतील प्रकार

point

मुख्याध्यापकाला पालकांनी दिला चोप

Principal Misconduct with Students : शिक्षकावर विद्यार्थ्याचे चरित्र घडवण्याची जबाबदारी असते. मात्र जर शिक्षकच चरित्रहीन निघाला तर? तर काय होईल याचं प्रत्यक्ष उदाहरण असणारी एक खळबळजनक घटना समोर आलीये. एका नामांकित शाळेत ही घटना घडलीये. या शाळेच्या मुख्याध्यापकाने आपल्या पदाचा गैरवापर करत 8 ते 10 वर्षांच्या विद्यार्थ्यांसोबत अश्लील चाळे केल्याचा आरोप करण्यात येत आहे. मुख्याध्यापकाची ही गैरवर्तणूक समोर येताच संतप्त पालक शाळेत पोहोचले आणि मुख्याध्यापकाला चोप दिला. उत्तरप्रदेशातील रामपूर परिसरातील सेंट फ्रान्सिस शाळेत हा प्रकार घडला आहे. सोशल मीडियात या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात पालकांनी मुख्याध्यापकाला 4 सेकंदात 6 कानाखाली मारल्याचे दिसून येत आहे.

हे वाचलं का?

हे ही वाचा : "तीन लग्नं केली, पुरावे नष्ट करून सोडून जातो..." सरकारी डॉक्टरवर पत्नीचे गंभीर आरोप, DNA चाचणीची मागणी

मुलांनीच दिली पालकांना माहिती

जोसेफ नावाच्या या मुख्याध्यापकावर असा आरोप आहे की, तो लहान मुलांना आपल्या ऑफिसमध्ये बोलावून त्यांच्याशी गैरवर्तन आणि अश्लील कृत्ये करत असे. शाळेतील काही मुलांनी घरी गेल्यानंतर आपल्या पालकांना या प्रकाराची माहिती दिली. मुलांकडून हे ऐकून हादरलेल्या पालकांनी तात्काळ काही गावकऱ्यांसह शाळा गाठली. त्यांनी मुख्याध्यापकाच्या केबिनमध्ये जाऊन मुलांच्या समोरच त्याची विचारपूस केली, तेव्हा मुलांनी मुख्याध्यापकाच्या गैरवर्तणूकीचा पाढाच वाचला.

4 सेकंदात 6 मुस्काटात

मुलांनी केलेल्या खुलाशानंतर पालकांचा संयम सुटला आणि त्यांनी जोसेफला केबिनमध्येच मारहाण करण्यास सुरुवात केली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये दिसते की, संतापलेल्या लोकांनी अवघ्या 4 सेकंदात मुख्याध्यापकाला 6 जोरदार थप्पड लगावले. हा व्हिडिओ इंटरनेटवर वेगाने पसरल्यानंतर परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकारामुळे पालकांमध्ये शाळांच्या सुरक्षेबाबत मोठी भीती आणि संताप व्यक्त केला जात आहे.

हे ही वाचा : भिगवण : लग्न चार दिवसांवर असताना तरुणीचं अपहरण, आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून पळवून नेलं

मुख्याध्यापक ताब्यात

घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. अप्पर पोलीस अधीक्षक अनुराग सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुख्याध्यापक जोसेफ विरुद्ध संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, शाळेतील इतर विद्यार्थ्यांशीही अशा प्रकारचे काही घडले आहे का, याची चौकशी केली जात आहे.
 

    follow whatsapp