"तीन लग्नं केली, पुरावे नष्ट करून सोडून जातो..." सरकारी डॉक्टरवर पत्नीचे गंभीर आरोप, DNA चाचणीची मागणी

महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिच्याशी लग्न करण्यापूर्वी आणि लग्नानंतर इतर महिलांशी देखील लग्न केलं. आरोपी तरुणाला पाच वर्षांची मुलगी असून ती स्वतःची असल्याचं मान्य करण्यास तो नकार देत आहे.

सरकारी डॉक्टरवर पत्नीचे गंभीर आरोप

सरकारी डॉक्टरवर पत्नीचे गंभीर आरोप

मुंबई तक

• 12:47 PM • 18 Feb 2026

follow google news

बातम्या हायलाइट

point

"तीन लग्नं केली, पुरावे नष्ट करून सोडून जातो..."

point

सरकारी डॉक्टरवर पत्नीचे गंभीर आरोप, DNA चाचणीची मागणी

Crime News: उत्तर प्रदेशातील झाशीमध्ये एका महिलेने आपल्या पतीवर गंभीर आरोप करत पोलिसात तक्रार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. महिलेच्या म्हणण्यानुसार, आरोपीने तिच्याशी लग्न करण्यापूर्वी आणि लग्नानंतर इतर महिलांशी देखील लग्न केलं. आरोपी तरुणाला पाच वर्षांची मुलगी असून ती स्वतःची असल्याचं मान्य करण्यास तो नकार देत आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी अनेक गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे आणि डीएनए चाचणी सुद्धा सुरू केल्याचं सांगितलं जात आहे. 

हे वाचलं का?

वृत्तानुसार, पीडिता ही झाशीच्या समथर परिसरातील रहिवासी असून सध्या नवाबाद पोलीस स्टेशन हद्दीत राहते. संबंधित महिलेने तक्रारीत सांगितलं की, 2020 मध्ये बुंदेलखंड युनिव्हर्सिटी हॉस्टेलमध्ये राहत असताना तिची राजवीर नावाच्या सरकारी डॉक्टरसोबत ओळख झाली. 

बलात्कार केला अन् अश्लील व्हिडीओ... 

कालांतराने त्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. या काळात, एके दिवशी आरोपीने तिला मदक पदार्थ मिसळून कोल्डड्रिंक प्यायला दिलं आणि त्यानंतर ती बेशुद्ध झाली. तेव्हा त्याने तिच्यावर बलात्कार केला आणि अश्लील व्हिडीओ सुद्धा बनवले. पीडिता शुद्धीवर आल्यानंतर, तिने आरोपीला याबाबत जाब विचारला आणि तेव्हा तो डॉक्टर म्हणाला की, त्याला ती आवडते आणि त्याला तिच्यासोबतच लग्न करायचं आहे. दरम्यान, पीडिता गरोदर राहिल्यानंतर, तिने 1 मे 2020 मध्ये आरोपीसोबत लग्न केलं आणि डिसेंबर महिन्यात तिने एका मुलीला जन्म दिला. 

हे ही वाचा: 7 वर्षांच्या मुलीवर शेजारी राहणाऱ्या पुरुषाचा बलात्कार... नंतर, पाण्याच्या ड्रममध्ये टाकून केली हत्या!

मात्र, मुलीचा जन्म झाल्यानंतर आरोपी सतत घराबाहेर राहू लागला आणि त्याने तिच्यासोबत बोलणं सुद्धा बंद केलं. इतकेच नव्हे तर, तो पीडितेला घरात कोंडून तिला मारहाण करायचा. पीडिता म्हणाली की, माझ्या पतीने माझ्याशी लग्न करण्यापूर्वी आणखी एका महिलेशी लग्न केले होतं आणि आमच्या लग्नानंतर सुद्धा, त्याने भिंडमध्ये राहणाऱ्या एका महिलेशी लग्न केलं. आरोपीने तीन लग्नं केली आणि पहिल्या पत्नीची हत्या केल्याचा आई-वडिलांनी आरोप केला. 

हे ही वाचा: 10 वीच्या मुलीची मैत्रिणींकडून फसवणूक, भावाकडून बलात्कार घडवून आणला अन् व्हिडीओ दाखवून ब्लॅकमेल...

पीडितेने तक्रारीत काय सांगितलं? 

तसेच पीडिता म्हणाली की, "त्याने माझ्यासोबत केलेल्या लग्नाचे सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. लग्नाच्या फोटोंसह सर्व काही त्याने डिलीट केले. आम्हाला 5 वर्षांची मुलगी आहे. मी डीआयजीकडून मुलीच्या आणि आरोपी पतीच्या डीएनए चाचणीची मागणी केली. कारण आता तो म्हणतो, आपला काहीच संबंध नाही आणि ही मुलगी सुद्धा माझी नाही." आता, आरोपीची डीएनए चाचणी केली जात असून तो केवळ पैशांसाठी लग्न करतो आणि नंतर पत्नीला सोडून देत असल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे, आरोपी डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. 

    follow whatsapp